शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

५ ऑगस्टपर्यंत 'हेल्मेट'शिवाय मिळणार पेट्रोल!

By admin | Updated: July 29, 2016 18:20 IST

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' या महत्त्वाकांक्षी निर्णयाला राज्य सरकारने ५ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. १ ऑगस्टपर्यंत राज्य सरकार याबाबतची आपली भुमिका स्पष्ट करणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' या महत्त्वाकांक्षी निर्णयाला राज्य सरकारने ५ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. १ ऑगस्टपर्यंत राज्य सरकार याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून रस्ते सुरक्षा समितीने दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक केले होते. 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' शासनाने काढलेले हे परिपत्रक मागे घ्यावे. दिवाकर रावते आणि पेट्रोल पंप असोसिएशनची बैठक आज पार पडली. त्यानंतर राज्य सरकार १ ऑगस्टपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. चर्चा करुन मार्ग काढण्याचे आदेश मंत्र्यांना देणार असल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
 
दुचाकीवरील वाढते अपघात रोखण्यासाठी चालकाकडे हेल्मेट असेल तरच त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळेल, असा आदेश परिवहन मंत्र्यांनी दिला. मात्र पेट्रोल न दिल्यास दुचाकी चालक आम्हालाच मारहाण करतील अशी भीती पेट्रोल पंप चालकांमध्ये आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल पंप चालकावरही गुन्हा दाखल करण्याचे शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे शासनाने हे परिपत्रक मागे घ्यावे. या मागणीसाठी १ ऑगस्टपासून पेट्रोल कंपन्यांकडून पेट्रोलच खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल-डिलर्स असोसिएशनने निर्णय घेतला होता. यात राज्यातील साडेचार हजार पेट्रोल पंप चालक सामिल होणार होते.
 
त्याचप्रमाणे ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ असा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या धोरणाबाबत विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. या आदेशाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार विरोध करून हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या उत्तरदाखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता.