शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट सक्तीविरोधात पेट्रोलपंप चालक एकवटले

By admin | Updated: July 27, 2016 19:22 IST

नो हेल्मेट नो पेट्रोल राज्य शासनाच्या या कायद्याविरोधात राज्य पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशन नो परचेस पेट्रोल-डिझेल अशा स्वरूपाचे आंदोलन १

ऑनलान लोकमत

अकलूज, दि. २ : नो हेल्मेट नो पेट्रोल राज्य शासनाच्या या कायद्याविरोधात राज्य पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशन नो परचेस पेट्रोल-डिझेल अशा स्वरूपाचे आंदोलन १ आॅगस्ट पासून करणार असून इंधन खरेदी विरोधातील या आंदोलनात राज्यातील ४ हजार ९०० डिलर्स सहभागी होणार तर सोलापूर जिल्ह्यातील २१९ डिलर्सचा सहभाग असणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय ताटे-देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य पेट्रोल पंप डिलर्स असो.च्या प्रमुख पदाधिकार्यांची तातडीची बैठक आज (बुधवार दि. २६) मुंबईत झाली. बैठकीसाठी असोसिएशनचे राज्याध्यक्ष उदय लोध, राज्य सल्लागार रमेश कुंदनमल, मुंबई विभाग प्रमुख रवी शिंंदे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते. नो हेल्मेट नो पेट्रोल हा नवीन कायदा १ आॅगस्टपासून अंमलात येणार आहे. या कायद्याला असोसिएशनाने कडाडून विरोध दर्शवला आहे. पेट्रोल पंप डिलर्स हे केवळ इंधन विक्रीचे काम करतात कोणत्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे त्यांचे काम नाही.

हा कायदा पेट्रोल पंपांवर अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला तर डिलर्सना रोज नव्या वादाला सामोरे जावे लागेल. पेट्रोल पंपांवर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागेल. डिलर्स व पेट्रोल पंपांवरील कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत असोसिएशनने १ आॅगस्टपासून इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पंपांवरील उपलब्ध असलेले इंधन संपले की हे सर्व पंप आपोआपच बंद राहतील. राज्य शासनाने हा कायदा त्वरीत मागे घ्यावा अन्यथा हे आंदोलन बेमुदत राहील अशा निर्णय घेण्यात आल्याचे संजय ताटे-देशमुख यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सचिव महेंद्र लोखंडे, करमाळा तालुकाध्यक्ष पंकज क्षीरसागर उपस्थित होते.- महाराष्ट्र राज्य पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनचे सोलापूर जिल्ह्यात २१९ डिलर्स सदस्य आहेत. हे सर्व डिलर्स १ आॅगस्टपासून या आंदोलनात सहभाग होणार आहेत. कोणत्याही कायद्याची अंमलबाजवणी इंधन विक्रेत्यांवर लादणे पुर्णपणे चुकीचे आहे. हा कायदा मागे घेण्याबाबत राज्य शासनाला आम्ही ३१ जुलै पर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा १ जुलै पासुन अंदोलन सुरु होणार आहे. -- संजय ताटे-देशमुखजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशन, सोलापूर