शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथ बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्र्रकरणी याचिका

By admin | Updated: February 14, 2017 03:42 IST

परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेतील कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात विद्यमान चेअरमन अशोक जैन आणि संचालक

औरंगाबाद : परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेतील कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात विद्यमान चेअरमन अशोक जैन आणि संचालक, तसेच इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्याची विनंती करणारी फौजदारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने एक आठवड्यात परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करावी व न्यायालयाने या तक्रार अर्जावर लवकरात लवकर आदेश द्यावेत, असा आदेश न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी या याचिकेच्या अनुषंगाने सोमवारी दिला.ही बँक विद्यमान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असून, त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे बँकेच्या संचालिका आहेत. त्यामुळे अधिकारी कार्यवाही करीत नाहीत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. बँकेचे सभासद सुभाष निर्मळ यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे. आश्रुबा गरड यांनी वेगवेगळ्या नावाने स्थापन केलेल्या बोगस कंपन्यांना जैन व संचालकांनी कुठलेही तारण न घेता, वरील कालावधीत २५ कोटी रुपये कर्जाऊ दिले. विशेष म्हणजे, सदर संस्थांच्या मालमत्ता यापूर्वी इतर बँकांकडे तारण ठेवलेल्या असतानाही वैद्यनाथ बँकेने त्यांना कर्ज दिले, तसेच एम. टी. देशमुख यांना २.५ कोटी रुपये, तसेच (स्व) गोपीनाथ मुंडे हे तत्कालीन चेअरमन असलेल्या व सध्या त्यांची मुलगी खासदार प्रीतम मुंडे चेअरमन असलेल्या सोलापूर येथील दंत महाविद्यालयाला ३ कोटी रुपये १०० रुपयांच्या बाँडवर कर्ज दिले. त्याचप्रमाणे, जळगाव येथील प्रभंजन आॅटोमोबाइल्स यांना ५ कोटी रुपये कर्ज दिले. अशा प्रकारे इतरांना जैन व संचालकांनी कोट्यवधी रुपये बेकायदेशीररीत्या कर्जरूपाने वाटप केले. त्यातील काही रक्कम जैन यांच्या नावावर हस्तांतरित झाली आहे, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. (प्रतिनिधी)