शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

आॅनलाइन औषध विक्रीविरोधात याचिका

By admin | Updated: October 7, 2015 02:06 IST

डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय आॅनलाइन औषध विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात

मुंबई : डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय आॅनलाइन औषध विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या व प्राध्यापिका मयूरी पाटील यांनी ही याचिका अ‍ॅड. वल्लरी जठार यांच्यामार्फत दाखल केली आहे. आॅनलाइन औषधांच्या विक्रीसह संबंधित संकेतस्थळांवरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली. न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी ७ आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. देशात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आॅनलाइन औषध विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात अशा काही औषधांचा समावेश आहे, ज्यामुळे आरोग्याला धोका होऊ शकतो. अशा औषधांमध्ये झोपेच्या गोळ्या, गर्भनिरोधक गोळ्या इत्यादींचा समावेश आहे. डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय या औषधांची विक्री आॅनलाइन होत असून, त्याचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे अशा आॅनलाइन औषध विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकेत केंद्र व राज्य सरकार आणि अन्न व औषध प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे. ही संकेतस्थळे बेकायदेशीर असूनही शासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)