शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’विरोधातील याचिका काढली निकाली

By admin | Updated: July 12, 2017 05:23 IST

वस्तू व सेवा कर (जीएसटी) आतापासून लागू न करता नव्या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात यावा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) आतापासून लागू न करता नव्या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी निकाली काढली. जीएसटीसंदर्भात सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आर्थिक वर्षाच्या मध्येच जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाला डॉ. के.एस. पिल्लई यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. व्ही.के. ताहिलरमाणी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरच जीएसटीची अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंती पिल्लई यांनी याचिकेत केली होती. मात्र केंद्र सरकारने या याचिकेवर आक्षेप घेतला. ‘संसदेने परवानगी दिल्यानंतर कोणताही कर आर्थिक वर्षात कधी लागू करायचा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. कायद्याने त्यावर प्रतिबंध घातला जाऊ शकत नाही,’ असेही अ‍ॅडिशनल सॉलिसिटरअनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.जीएसटीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी आणि गोंधळ उडू नये यासाठी केंद्र सरकारने देशभरातील ६० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच जीएसटी सेवा केंद्रेही उभारली आहेत. त्यात करदाते थेट त्यांच्या शंकांचे निरसन करू शकतात. आतापर्यंत ६५ लाख करदाते जीएसटीच्या कक्षेत आले आहेत, अशीही माहिती सिंग यांनी न्यायालयाला दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले.