शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध मातेचा पंख्याला लटकवून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2016 02:14 IST

अंधेरी येथे राहणाऱ्या एका निर्दयी इसमाने स्वत:च्या जन्मदात्या मातेला साडीने पंख्याला लटकवून तिचा अतोनात छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई : अंधेरी येथे राहणाऱ्या एका निर्दयी इसमाने स्वत:च्या जन्मदात्या मातेला साडीने पंख्याला लटकवून तिचा अतोनात छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेचे तोंड कपड्याने तर पाय साडीने बांधले होते. त्यानंतर तिला पंख्याला बांधून गोल फिरवत असल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री या नराधम पुत्रासह तिची सून व नातीला अटक केली. सुरेंद्र वैद्य (वय ४७) असे या नराधमाचे नाव असून, पत्नी बबिता व मुलगी आकांक्षा यांच्या साथीने हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले. मुलाच्या छळवणुकीला बळी पडलेल्या पीडित महिलेचे नाव मायावती वैद्य (७५) असे आहे. ही घटना तीन महिन्यांपूर्वीची असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले असून एका स्वयंसेवी महिला संस्थेच्या कार्यकर्तीने क्लिप मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईला घाबरविण्यासाठी असे कृत्य केल्याची कबुली सुरेंद्रने पोलिसांना दिली आहे. अंधेरीतील इंडियन आॅईल जवळच्या एसआरए इमारतीत तिसऱ्या मजल्यावर मायावती वैद्य या मुलासह राहतात. हे सर्वजण सफाईचे काम करतात. वृद्धापकाळामुळे मायावती यांना विस्मरण होत असल्यामुळे सुरेंद्र, त्याची पत्नी आणि नातीकडून गेल्या तीन वर्षांपासून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. या छळाची १.४० मिनिटांची एक व्हिडीओ क्लिप नारी सन्मान संघटनेच्या प्रमुख सुंदरी ठाकूर याना दोन आठवड्यांपूर्वी वर्सोव्यातील मनोज सिंग यांच्याकडून मिळाली. या क्लिपमध्ये सुरेंद्र आईचे पाय साडीने बांधून तिला पंख्याला लटकवतो, असे दिसते. जमिनीवर पडल्यानंतरही त्यांना पंख्याप्रमाणे गोलगोल फिरवून जीवे मारण्याची धमकी देताना दिसत आहे. हा सर्व क्रूर प्रकार सुरू असताना खोलीतच उपस्थित असलेली त्याची पत्नी आणि मुलगी चक्क हसत आहेत. या प्रकारामुळे रडणाऱ्या मायावती यांची तिघेजण खिल्ली उडवत असून, आकांक्षा चक्क या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असल्याचे दिसते. पोलिसांनी सुरेंद्र वैद्यसह तिघांना अटक केली. त्यांच्यावर विनयभंग, मारहाण, संगनमताने छळ करणे अशी कलम दाखल करण्यात आली असल्याचे डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)इतना सीरियस नही है!सुरेंद्रने आई वेडसर चाळे करत असल्याने तिला भीती दाखविण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली दिली. ‘व्हिडिओ मे जितना दिखता है उतना वो सीरियस नहीं है’, असा कांगावाही त्याने केला. मायावती यांच्या नावावर सहा फ्लॅट आहेत. मात्र त्या मोठ्या मुलावर अधिक प्रेम करतात, असा आक्षेप घेऊन त्यांना तिघेजण त्रास देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवाच्या काळात ही क्लिप मिळाली होती. मात्र त्यावेळी पोलीस बंदोबस्तात व्यस्त आल्याने तक्रार केली नाही. मंगळवारी रात्री त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा किळसवाणा प्रकार पाहून पोलिसांनाही अश्रू अनावर झाले. अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. - सुंदरी ठाकुर, अध्यक्ष, नारी सन्मान