शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पार्कवर पार्किंग करण्यास सशर्त परवानगी

By admin | Updated: September 2, 2016 02:04 IST

शिवाजी पार्कवरील पार्किंगसाठी पर्यायी जागा शोधण्याकरिता दोन आठवड्यांत समिती नेमण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने गणेश विसर्जनाच्या

मुंबई : शिवाजी पार्कवरील पार्किंगसाठी पर्यायी जागा शोधण्याकरिता दोन आठवड्यांत समिती नेमण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने गणेश विसर्जनाच्या पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी शिवाजी पार्कवर वाहने पार्क करण्याची परवानगी दिली. मात्र, शिवाजी पार्कवर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजीही उच्च न्यायालयाने संबंधितांना घेण्यास सांगितले आहे.गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी शिवाजी पार्कवर पार्किंग करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात नोटीस आॅफ मोशन दाखल केले. या नोटीस आॅफ मोशनवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. ९ सप्टेंबर २०१० रोजी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शिवाजी पार्कवर पार्किंग करण्याऐवजी अन्य जागा शोधण्याचा आदेश दिला होता. जागा शोधण्यासाठी सरकारला एक समिती स्थापन करण्याचाही आदेश दिला होता. मात्र, पाच वर्षे सरकारने या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने, बुधवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत समिती नेमा अन्यथा शिवाजी पार्कवर पार्किंग करण्यास परवानगी देणार नाही, अशी तंबी राज्य सरकारला दिली.त्यानुसार, गुरुवारी सरकारने दोन आठवड्यांत समिती नेमण्यात येईल, अशी हमी खंडपीठाला दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने गणेश विसर्जनाच्या वेळी शिवाजी पार्कवर पार्किंग करण्याची सशर्त परवानगी दिली. शिवाजी पार्क खराब झाल्यास अनंत चर्तुदशीनंतर एका आठवड्यात मैदान ‘जैसे-थे’ स्थितीत ठेवा, तसेच पार्किंगमुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याचीही खबरदारी घ्या, असेही उच्च न्यायालयाने सरकारला बजावले. (प्रतिनिधी)