शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस स्पिकर सुरु ठेवण्याची परवानगी

By admin | Updated: August 16, 2016 20:39 IST

गणेश उत्सवाच्या काळात शेवटचे पाच दिवस रात्री उशीरा पर्यंत स्पिकर सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 16 - गणेश उत्सवाच्या काळात शेवटचे पाच दिवस रात्री उशीरा पर्यंत स्पिकर सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिका-यांनी आपल्या अधिकारात एक दिवस दिला असून, जिल्हाधिका-यांना हा अधिकार वापरता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याबाबत येत्या २२ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबईत बैठक होणार असून, त्यानंतरच पाच दिवसांबाबत अतिम निर्णय होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा नंतर स्पिकर, ढोल-ताशे वाजविण्यास बंदी आहे. परंतु यामध्ये न्यायालयाने सणा-सुदीच्या काळात वर्षांतील केवळ १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत स्पिकर सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. हे दिवस ठरविण्याचे अधिकारी न्यायालयाने राज्य शासनाला दिले. त्यानुसार राज्य शासनाने १२ दिवस स्व:ताच्या अधिकारामध्ये निश्चित केले असून, स्थानिक परस्थितीनुसार निर्णय घेण्यासाठी ३ दिवस संबंधित जिल्हाधिका-यांना हे अधिकार दिले आहेत. त्यानुसार पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी गणेश उत्सवाच्या काळात आपल्या अधिकारातील एक दिवस रात्री बारा वाजेपर्यंत स्पिकर सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.जिल्हाधिका-यांच्या निर्णयानुसार आता १०, ११,१२, १३ आणि १५ सप्टेंबर असे पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत स्पिकर सुरु ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये १२ सप्टेंबर ही जिल्हाधिका-यांनी निश्चित केली आहे. परंतु याबाबत न्यायालयाने जिल्हाधिका-यांना हे अधिकार वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत राव यांनी सांगितले की, येत्या २२ आॅगस्ट रोजी मुंबईत पुणे, ठाणे आणि मुंबईतील गणेश मंडळाच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्येच जिल्हाधिका-यांच्या अधिकारा बाबत अंतिम निर्णय होईल.सीसीटीव्ही बंदचा अहवाल मागविणारशहराच्या सुरक्षितेसाठी शासनाच्या वतीने एक हजार पेक्षा अधिक सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.पंरतु यापैकी अनेक सीसीटीव्ही सध्या बंद पडले असल्याची स्थिती आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही आणि त्यांची स्थिती, किती बंद पडले आहेत याबाबत सविस्तर अहवाल मागविणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.