शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

घातक नायलॉन मांजावर कायमची बंदी

By admin | Updated: July 27, 2016 19:52 IST

पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई यांनी १८ जून २०१६ रोजी पर्यावरण (संरक्षण) कायदा-१९८६ मधील कलम ५ अंतर्गत अधिसूचना जारी करून नायलॉन मांजावर कायमची बंदी आणली

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २७  : पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई यांनी १८ जून २०१६ रोजी पर्यावरण (संरक्षण) कायदा-१९८६ मधील कलम ५ अंतर्गत अधिसूचना जारी करून नायलॉन मांजावर कायमची बंदी आणली आहे. अधिसूचनेनुसार यापुढे नायलॉन मांजाचा साठा, विक्री व वापर करता येणार नाही. नायलॉन मांजा विविध बाबतीत प्रचंड घातक ठरत असल्याचे आढळून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून या अधिसूचनेची माहिती दिली.

नायलॉन मांजावर कायमची बंदी आणण्यात आल्यामुळे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी संबंधित रिट याचिका निकाली काढली. या निर्णयामुळे याचिका निष्प्रभ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी शासनाने नायलॉन मांजाचा साठा, विक्री व वापर करण्यावर केवळ मकर संक्रांती काळापुरती बंदी आणली होती. परंतु, मकर संक्रांतीचा काळ कोठून कु ठपर्यंत ग्राह्य धरायचा हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. परिणामी रिद्धी सिद्धी पतंग व्यापारी संघटनेने ही याचिका दाखल केली होती.