शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडणे योग्यच!

By admin | Updated: November 14, 2015 03:43 IST

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ऊर्ध्व भागातील धरणातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या आदेशाशी सुसंगत

औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ऊर्ध्व भागातील धरणातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या आदेशाशी सुसंगत असून त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असा निर्वाळा प्राधिकरणाचे अध्यक्ष रविभूषण बुद्धिराजा, सदस्या चित्कला झुत्शी व सदस्य एस.व्ही. सोडल यांनी दिला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यांतील साखर कारखाने व इतर अशा एकूण ७ याचिकाकर्त्यांनी महामंडळाच्या यापूर्वीच्या आदेशाला आव्हान दिले होते. जायकवाडी जलाशयात पिण्याचे पाणी उपलब्ध असल्यामुळे वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. पाणी सोडल्यास उलट ऊर्ध्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल आणि ऊस व बागायती पिकांचेही मोठे नुकसान होईल. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर प्राधिकरणाने महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाला आव्हान दिले होते. मराठवाड्यातील नागरिकांतर्फे परभणीचे प्रा. अभिजित धानोरकर जोशी यांनी अ‍ॅड. यशोदीप देशमुख यांच्यामार्फत लेखी निवेदन देऊन प्राधिकरणाच्या आदेशाचे समर्थन केले. मराठवाड्यासाठी जायकवाडी जलाशयात किमान २२ टीएमसी पाणी ऊर्ध्व भागातून उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. देशमुख यांनी केले. त्याचप्रमाणे जायकवाडी क्षेत्रातील पाण्याच्या गरजेची संपूर्ण आकडेवारी तसेच नाशिक व नगर जिल्ह्यांतील पाण्याची योग्य आकडेवारी समोर येईपर्यंत सुनावणी स्थगित ठेवण्याची विनंतीही त्यांनी केली. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी १३.५२ टीएमसी पाण्याची गरज असल्याची माहिती सादर केली. पाण्याचा ३० टक्के वहनव्यय गृहीत धरून केवळ ८.९७ टीएमसी पाणी लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासाठी १२१.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे, असा निर्वाळा प्राधिकरणाने ९ नोव्हेंबर २०१५ रोजी दिला व त्याची अंमलबजावणी तत्काळ करावी, असेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)