शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोक मत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ ३ जूनपासून

By admin | Updated: May 30, 2016 01:41 IST

कालच दहावीच्या सीबीएसईचा निकालही जाहीर झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाचे इच्छुक पर्याय शोधत आहेत;

पुणे : यंदाच्या शैक्षणिक वर्षातील बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यापाठोपाठ कालच दहावीच्या सीबीएसईचा निकालही जाहीर झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाचे इच्छुक पर्याय शोधत आहेत; तसेच आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती फी भरावी लागेल, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांना भंडावून सोडत असतील; मात्र आता आपल्या पाल्याच्या करिअरची चिंता करणे सोडा. कारण, खास आपल्यासाठी ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाद्वारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचता येणार आहे. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत समूहा’तर्फे यंदाही अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर; अर्थात भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन ३ ते ५ जून दरम्यान पंडित फार्मस, म्हात्रे पूल जवळ, कर्वेनगर येथे होणार आहे. पालक असो वा पाल्य, दोघांच्याही मनात करिअरसाठीच्या, शिक्षणा- विषयीच्या अनेक शंका, प्रश्न असतात. त्यांचे निराकरण या प्रदर्शनात होईल. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनात मार्गदर्शन करतील. याशिवाय महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफि क्स, इंटिरियर डिझाइनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत; तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेजेस, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. व्यवसायवाढीसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण, एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिक रीत्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येईल. यानिमित्ताने नवा वर्ग आपल्या संस्थेशी जोडला जाईल. यामध्ये निवडक स्टॉल शिल्लक असून, आपल्या शैक्षणिक संस्थेचा स्टॉल बुक करण्यासाठी कृपया माधव रानडे नं. ९८२२६९७८०८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या उपक्रमाचे दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड व के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे असोसिएट पार्टनर आहेत. (प्रतिनिधी)१४ जिल्ह्यांत भरणार प्रदर्शन‘लोक मत अ‍ॅस्पायर एज्युके शन फेअर २०१६’ हे राज्यस्तरीय प्रदर्शन १४ जिल्ह्यांमध्ये भरविण्यात येणार आहे. यात औरंगाबाद, अहमदनगर, गोवा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, जळगाव, नागपूर, सांगली, अकोला, अमरावती, नागपूरचा समावेश आहे.भेटवस्तू देणारप्रदर्शनाला भेट देणाऱ्यांपैकी एका भाग्यवंताला दर तासाला आकर्षक भेटवस्तू दिली जाईल.विविध सेमिनारचे आयोजनप्रदर्शनामध्ये विविध विषयांवरील तज्ज्ञ व्यक्तींकडून शैक्षणिक संधींचे विनामूल्य सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.