शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशच्या जनतेने स्मशानाच्या बाजूनं मतदान केले- उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 12, 2017 11:27 IST

उत्तर प्रदेशातील विजय हा नोटाबंदीच्या निर्णयाचा विजय नसून कर्जमाफीच्या गाजराचा विजय आहे, स्मशानाचा विजय आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - भाजपानं उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यामुळे अनेकांनी भाजपाचं कौतुक केलं आहे. मात्र महाराष्ट्रात मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं भाजपावर खरमरीत टीका केली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने कब्रस्तान विरुद्ध स्मशान या वादात स्मशानाच्या बाजूने मतदान केल्याची टिपण्णीही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील विजय हा नोटाबंदीच्या निर्णयाचा विजय नसून कर्जमाफीच्या गाजराचा विजय आहे, स्मशानाचा विजय आहे. उत्तर प्रदेशातील तुफानाचे पाणी बाजूच्या उत्तराखंड राज्यात पोहोचले व तेथेही भाजपला बहुमत मिळाले, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. गाव तेथे स्मशान हे धोरण राबवले तर काय होईल? ही भीती आम्हाला वाटते. स्मशानांपेक्षा कर्जमाफीची आणि रोजगार, कायदा-सुव्यवस्थेची तेथे गरज आहे. आम्ही नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत आहोत! ते जिंकलेच आहेत. पंतप्रधान मोदी हे उत्तर हिंदुस्थानात मतांचे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झाले. जाहीर सभांतून त्यांनी लोकांना प्रश्न केला, उत्तर प्रदेशात कब्रस्तान जास्त आहेत. तुम्हाला स्मशान हवे की कब्रस्तान हवे? पंतप्रधानांचा संदेश स्पष्ट होता. उत्तर प्रदेशात मुसलमानांची राजवट सुरू आहे. हिंदूंनी ती संपवायला हवी. हिंदू आणि मुसलमान अशी सरळसरळ फाळणी त्यांनी केली. मोदी यांना विजयासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळावेच लागले, पण राममंदिराऐवजी त्यांनी हिंदूंसाठी स्मशाने प्रचारात आणल्याचं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. प्रचंड विजयानंतर तरी रामाचा वनवास संपून अयोध्येत राममंदिर उभे राहील काय, असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला विचारण्यात आला आहे.पंतप्रधान मोदींचा चमत्कार आणि करिश्मा कायम आहे. उत्तर प्रदेश हा देशाच्या राजकारणातील गड आहे. दिल्ली राजधानी असली तरी उत्तर प्रदेश हा गडच आहे. गड जिंकल्याचा जल्लोष देशभर सुरू आहे. उत्तर प्रदेशात 325 जागांचे तुफानी बहुमत मिळवून मोदी यांनी विरोधकांना चीत केले आहे. अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी व मायावतींच्या बसपाची साफ धुळधाण झाली आहे. यादवांना 60 जागाही मिळाल्या नाहीत आणि मायावतींना 20 जागांचा टप्पा गाठता आला नाही. उत्तर प्रदेशातील हे विजयी तुफान देशाच्या राजकारणावर परिणाम करणार आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.