शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीतील ‘राजबंदीं’ना पेन्शन

By admin | Updated: September 23, 2016 06:33 IST

पेन्शन वा मानधन देण्याचा विचार राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार करीत असून, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यास अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती समोर आली आहे.

यदु जोशी , मुंबई स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे आणीबाणीच्या विरोधात तुरुंगवास भोगलेल्या मंडळींनादेखील पेन्शन वा मानधन देण्याचा विचार राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार करीत असून, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यास अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाचा फायदा तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाजवादी कार्यकर्त्यांना होऊ शकतो.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात देशात आणीबाणी लागू केली होती. या काळात ज्यांनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला अशा अनेकांना सरकारने तुरुंगात डांबले. यामध्ये रा.स्व. संघाचे स्वयंसेवक, समाजवादी, डावे पक्ष आणि कामगार पुढाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. आणीबाणी हा एक प्रकारचा स्वातंत्र्यलढाच होता, त्यामुळे या लढ्यातील कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी भूमिका प्रामुख्याने रा.स्व. संघाचे कार्यकर्ते मांडत आले आहेत. देशात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या मागणीचा जोरकसपणे पाठपुरावा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात असंख्य पत्रे पाठविण्यात येत आहेत.यासंदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील रा. स्व. संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन या मागणीचा पुनरुच्चार केला. शिवाय, मध्य प्रदेशात आणिबाणीतील बंदीवानांना मासिक मानधन आणि इतर सवलती दिल्या जातात, याकडे शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांचे लक्ष वेधले. स्वंयसेवकांच्या भावनांशी सहमती दर्शवित यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन पाटील यांनी दिले.१९७५ ते ७७ या काळात संघ स्वयंसेवक आणि समाजवादी कार्यकर्त्यांना मिसा अंतर्गत धरपकड करून मोठ्या प्रमाणात तुरुंगात टाकण्यात आले होते. या घटनेला आता जवळपास चार दशके उलटली असून त्या बंदिवानांपैकी अनेक जण आज हयात नाहीत.