शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पेण अर्बन संघर्ष समितीची हायकोर्टात धाव

By admin | Updated: May 12, 2014 03:27 IST

७५० कोटीच्या पेण अर्बनच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळविण्याच्या आशा-आकांक्षांना न्यायालयीन लढाईत न्याय मिळत असतानाच लोकसभा निवडणूक संपताक्षणी सहकार आयुक्तांनी पेण अर्बन बँक दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय म्हणजे ठेवीदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असून या सहकार आयुक्ताच्या निर्णयाविरोधात उद्या मुंबई उच्च न्यायालयात व्हेकेशन कोर्टात निर्णया विरोधात स्थगिती मिळविणार असे आजच्या पेण येथील सभेप्रसंगी ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव व अध्यक्ष आ. धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट केले.

पेण : ७५० कोटीच्या पेण अर्बनच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळविण्याच्या आशा-आकांक्षांना न्यायालयीन लढाईत न्याय मिळत असतानाच लोकसभा निवडणूक संपताक्षणी सहकार आयुक्तांनी पेण अर्बन बँक दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय म्हणजे ठेवीदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असून या सहकार आयुक्ताच्या निर्णयाविरोधात उद्या मुंबई उच्च न्यायालयात व्हेकेशन कोर्टात निर्णया विरोधात स्थगिती मिळविणार असे आजच्या पेण येथील सभेप्रसंगी ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव व अध्यक्ष आ. धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट केले.सायंकाळी ५.४५ वाजता ठेवीदार संघर्ष समितीची वादळी बैठक पेणच्या गुरुकुल हायस्कूलच्या क्रिडांगणावर सुरू झाली. यावेळी सहकार आयुक्तानी पेण अर्बन बँकेला दिवाळखोरीत काढण्याच्या निर्णयाचा धिक्कार करण्यात आला. समितीने न्यायालयीन लढाईत सर्व काही ठेवीदारांच्या बाजूने होत असताना, जिल्हा सत्र न्यायालयाने ठेवीदार हितसंरक्षक कायद्यानुसार पेण अर्बनच्या जप्त केलेल्या ३५ प्रॉपर्टीजचे लिलाव करण्याचे आदेश प्रांताधिकार्‍यांना दिलेले असताना सुद्धा न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करण्याचा प्रकार आयुक्तानी घेतलेल्या निर्णयामुळे झाला. बँकेच्या नॉन बँकिंग एका प्रॉपर्टीज विकून ३५ कोटी मिळाले तर बँकेच्या एकूण ६५ प्रॉपर्टीज विकून ५०० ते ६०० कोटी सहज जमा होवून बँक पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरु असतानाच राज्य शासनाच्या सहकार आयुक्ताचा हा निर्णय ठेवीदारांच्या पाठीत खंजीर खुपसणारा आहे. यासाठी उद्या हायकोर्टात समितीचे वकील ॲड. श्रीराम कुलकर्णी या प्रकरणी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून सहकार आयुक्ताच्या निर्णया विरोधात स्थगिती मिळविणार असे या बैठकीत स्पष्ट झाले. या शिवाय १३ मे च्या मोर्चासंबंधी मोठ्या संख्येने हजर राहून रायगड जिल्हाधिकार्‍यांना या सहकार खात्याच्या निर्णयाविरोधात फॅमिली धडक मोर्चाद्वारे तक्रार निवेदन देणार आहोत. ठेवीदार संतप्त झाले असून पेण अर्बनची ही लढाई न्यायालयीन प्रक्रियेनंतर काय वळण घेते याकडे आता समस्त ठेवीदारांच्या नजरा लागल्या आहेत. बैठकीत संघर्ष समितीचे सर्व सदस्य व ठेवीदार उपस्थित होते. (वार्ताहर)