शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

नभांगणात सोडला पालापाचोळ्याचा धूर

By admin | Updated: July 21, 2014 22:23 IST

वनोजाच्या शेतकर्‍यांचा अभिनव प्रयोग: श्रद्धेला विज्ञानाची जोड

मंगरूळपीर : यंदा मृग नक्षत्रापासूनच वरुणराजा जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर कोपला आहे. पेरण्यांचे नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणारा मृग कोरडाठण्ण गेला. परिणामी पेरण्या रखडल्या. नभांगणात दररोजच ढगांची मांदियाळी झालेले दिसते. मात्र, पावसाचा पत्ता नसतो. काही जाणकारांच्या मते यंदाच्या पावसाळ्यात पाऊस पडण्याजोगे वातावरणच तयार झाले नाही. नेमकी हीच बाब हेरून तालुक्यातील वनोजा येथील शेतकर्‍यांनी वातावरण निर्मितीसाठी १९ जुलैला मीठ मि२िँं१्रूँं१त पालापोचाळ्याचा धूर अकाशात सोडण्याचा अभिनव प्रयोग केला.तालुक्यात यंदा पावसाची सरासरी फारच कमी आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक पावसाची नोंद करणार्‍या तालुक्यात आतापर्यंत ९0.८ मि.मी पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या त्या उलटून गेल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. तालुकावासीयांवर रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कार्यक्रम, धोंडी असे कितीतरी आध्यामिक कार्यक्रम केले आहेत; परंतु वनोजा येथील शेतकर्‍यांनी अध्यात्माला विज्ञानाची जोड देत नवा प्रयोग केला. त्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात आली. १९ जुलैला सकाळपासूनच या प्रयोगाला सुरुवात केली. दिवसभर हिरवा पालापाचोळा जमा करून भट्टीत टाकून जास्तीत जास्त धूर करण्याचा प्रयत्न सुरू होता. दुपारी रिमझिम पाऊस सुरू झाला होता. प्रयोग यशस्वी होत असल्याचे पाहून त्यांच्या आनंदात अधिकच भर पडली. ** गावातील शेतकर्‍यांनी लोकवर्गणी करून ३५ मिठाचे कट्टे व ५0 लीटर केरोसीन जमा करून दोन ठिकाणी आकाशात धूर करण्याचा प्रयोग केला. यासाठी गाव तलावाजवळील व अकोला मार्गावरील घाट टेक ही दोन ठिकाणे निश्‍चित करण्यात आली. दोन्ही ठिकाणी एका टाकीत हिरवा पालापाचोळा गोळा करण्यात आला. त्यामध्ये मीठ टाकण्यात आले. मीठ मि२िँं१्रूँं१त हा पालापाचोळा पेटवून दिल्या गेला. फवारणीच्या पॉवर स्प्रे पेट्रोल पंपाद्वारे हवा घेऊन धूर तयार केला. या धुरामुळे आकाशात वातावरण निर्मिती होऊन परिसरातील ५ कि.मी अंतराच्या आत पाऊस पडतो, असा त्यांना विश्‍वास आहे.