शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवाराच्या घोषणेत शेकापची आघाडी

By admin | Updated: October 17, 2016 02:48 IST

डिसेंबरमध्ये होवू घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून होणार आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- डिसेंबरमध्ये होवू घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून होणार आहे. या निवडणुकीकरिता शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अलिबागचे विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक हेच राहणार असल्याची घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.रविवारी येथील कच्छीभवन सभागृहात अलिबाग शहर शेकापच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी अलिबागचे विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, अलिबाग पं.स. उपसभापती अनिल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा कार्यकारिणी सदस्य नृपाल पाटील, अलिबाग तालुका शेकाप चिटणीस अनिल पाटील, शेकाप पुरोगामी युवा संघटना अध्यक्ष अ‍ॅड.संजय पाटील, अलिबाग मुस्लीम समाज प्रतिनिधी नुर सय्यद, शेकाप कार्यालयीन चिटणीस अनंतराव देशमुख, अलिबाग व्यापारी संघटना प्रतिनिधी मुकेश जैन, राजू जैन आदी उपस्थित होते.अलिबाग नगरपरिषदेतील तीस वर्षांच्या शेकाप सत्ताकाळातील परिवर्तनाच्या प्रक्रियेचा आढावा यावेळी जयंत पाटील यांनी घेतला. प्रथम प्रशांत नाईक यांच्या मातोश्री सुनीता नाईक, नंतर पत्नी अ‍ॅड. नमिता नाईक आणि स्वत: प्रशांत नाईक या तिघांनी अलिबाग शहराच्या नागरिकांबरोबर राजकारणाच्या चौकडी पलीकडे जाऊन व्यक्तिगत नाते निर्माण केले आहे. नाईक यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत नगरसेवक वा नागरिक यांच्याकडून एकही तक्रार आली नसल्याने, सर्वानुमतेच त्यांची नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्चिती केली असल्याचे त्यांनी सांगितले.शहराच्या हद्दीत २४ किमी लांबीचे रस्ते आहेत, त्यापैकी १२ ते १३ किमीचे रस्ते काँक्रीट व पेव्हरब्लॉकचे करण्याचे काम नगरपरिषदेने केले आहे. रस्त्याच्या कामांकरिता आमदार पंडित पाटील यांनी पाठपुरावा करुन ५ कोटी रुपये आणले. शहरातील कचरा रात्री उचलणे आणि रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करणे याबाबतचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.अलिबाग कोळीवाडा देखील अलिबागच्या ब्राम्हणआळीप्रमाणे स्वच्छ आणि सुरेख करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता कोळीवाड्यात एफएसआय ४ करुन आणण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. शहरातील मासळी बाजार आधुनिक पद्धतीने बांधून तो वातानुकूलित व स्वच्छ ठेवण्याचे नियोजन आमदार निधी व अन्य निधीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.>विजेसाठी १०० कोटी३० वर्षांत अलिबाग शहरात पाणीपट्टी वाढविण्यात आलेली नाही. शहरात भूमिगत केबलद्वारे वीज पुरवठ्याच्या प्रकल्पासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. भूमिगत नाल्याची योजना कंत्राटदाराच्या अकार्यक्षमतेने प्रलंबित आहे. त्यासाठीचे २० कोटी रुपये नगरपरिषदेकडे जमा आहेत. येत्या काळात नव्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.