शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीची बैठक

By admin | Updated: February 27, 2017 05:22 IST

शेकाप, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची विशेष बैठक रविवारी पनवेल तालुक्यातील तारा येथे संपन्न झाली.

पनवेल : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर शेकाप, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची विशेष बैठक रविवारी पनवेल तालुक्यातील तारा येथे संपन्न झाली. बैठकीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार विवेक पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस श्याम म्हात्रे, आमदार धैर्यशील पाटील, आमदार सुरेश लाड, काँग्रेसचे पनवेल तालुका चिटणीस नारायण ठाकूर, शेकापचे पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील, महिला आघाडी अध्यक्षा चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ आदी मान्यवर उपस्थित होते.रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्यांचा एकमेकांशी परिचय होण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदस्यांसाठी लवकरच आदर्श कार्यपद्धती आणि अधिकारांचा योग्य वापर यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजिले जाणार असल्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. तसेच वेळोवेळो सदस्यांचे आॅडिट करणार असल्याचे सूतोवाचही यावेळी करण्यात आले. (प्रतिनिधी) >२०१९च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीतही एकदिलाने काम करू. जातीयवादी शक्तींना थांबवण्याच्या कार्याची सुरु वात रायगडातून झाली असून त्याचा मला अभिमान आहे. पुरोगामी विचारांना जनाधार मिळत आहे, तेसुद्धा त्याचेच द्योतक आहे. - सुनील तटकरे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस>रायगड जिल्ह्यातील आघाडी ही एक विचारधारा टिकवण्यासाठी झाली आहे. सत्ता प्राप्त करणे हे आघाडीचे ध्येय नाही. सध्या जातीयवादी विचार पुरोगामी विचारांचा गळा घोटू पाहात आहेत. म्हणून आपण एकत्रित काम करणार आहोत. जनसेवा करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे पंचायत समिती आहे. असे कार्य करा की जनतेनी पुन्हा निवडून दिलेच पाहिजे. - जयंत पाटील, आमदार