शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

शांतता, प्रचार संपला!

By admin | Updated: October 14, 2014 01:02 IST

गत दोन आठवड्यापासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज सांयकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवस राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखविली.

बहुरंगी लढती : मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यतानागपूर : गत दोन आठवड्यापासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज सांयकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवस राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखविली. युती आणि आघाडी स्वतंत्रपणे निवडणुका लढवीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातही प्रत्येक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र आहे. प्रत्येक प्रमुख उमेदवार त्याचे मतदार बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असल्याने, त्यातून मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक होत असून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, मनसे, बसपा यांच्यासह छोट्या-मोठ्या पक्षाचे एकूण २११ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान चार प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणुकीत त्यांचे भाग्य आजमावीत आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या ही ३७ लाखांवर आहे. निवडणुकीत प्रत्येक मतदार हा जास्तीतजास्त मतदार बाहेर काढण्यावर भर देणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेतली तर यावेळी मतदानाची टक्केवारी गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. याशिवाय निवडणूक आयोगानेही मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर नियुक्त करून शाळा-महाविद्यालयांत मतदार जागृती अभियान राबविले आहे.उमेदवारांची संख्या अधिक असल्याने विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे विशेष असणार नाही. त्यामुळे जो उमेदवार जास्तीतजास्त मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यास यशस्वी होईल त्याला जिंकण्याची संधी आहे. राजकीय पक्षानेही त्यांच्या अधिकाधिक जागा जिंकून याव्या यासाठी यंत्रणा तयार केली असून, त्याचाही मुख्य आधार हा मतदारांना घराबाहेर काढण्यावरच असणार आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मतदानाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.२००९ च्या निवडणुकीत काटोल (६४.८९ टक्के), सावनेर ( ७०.१९ टक्के) हिंगणा (५८.१३ टक्के), उमरेड (६२.६८ टक्के), कामठी (५८.८२ टक्के), रामटेक (६४.७६ टक्के), दक्षिण-पश्चिम (४९.८० टक्के), दक्षिण नागपूर (४७.५८ टक्के), पूर्व नागपूर (५६.६० टक्के), मध्य नागपूर (५०.७६ टक्के), पश्चिम नागपूर (४६.९६ टक्के), उत्तर नागपूर (४८.०२ टक्के).(प्रतिनिधी)विनापरवानगी एसएमएस फोन करणाऱ्यांना नोटीसप्रचार थांबल्यावर एसएमएस किंवा फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास मनाई आहे. मात्र तरीही विनापरवानगी उमेदवारांचे प्रचारासाठी एसएमएस आणि फोन येत आहेत. याकडे सोमवारी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांचे लक्ष वेधले. विनापरवानगीने एसएमएस किंवा फोन करणाऱ्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय निवडणूक शाखेने घेतला आहे.