शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

५० हजारांच्या उत्पन्नावर १० हजारांची पोटगी वैध

By admin | Updated: November 19, 2014 04:50 IST

पतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपये असल्यास विभक्त झालेल्या पत्नीला १० हजार रुपये पोटगी देण्यात काहीच चुकीचे नाही,

नागपूर : पतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपये असल्यास विभक्त झालेल्या पत्नीला १० हजार रुपये पोटगी देण्यात काहीच चुकीचे नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. याप्रकरणातील दाम्पत्य नागपूर येथील रहिवासी आहे. पती छत्तीसगडमध्ये नोकरीला असून पत्नी नागपुरात भाड्याच्या घरात राहते. त्यांना अपत्य नाही. १० जुलै २००८ रोजी त्यांचे लग्न झाले होते. दोघांमध्ये पटत नसल्यामुळे ते विभक्त झाले. पत्नीकडून क्रूर वागणूक मिळत असल्याचा आरोप करून पतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. पत्नीने पोटगीसाठी दावा केला होता. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला १० हजार रुपये मासिक पोटगी व खटल्याचा पाच हजार रुपये खर्च देण्याचा आदेश दिला. या आदेशाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला. आपली मासिक कमाई केवळ तीन हजार रुपये असल्याचे पतीने तोंडीच सांगितले. त्यावर पत्नीने पतीचे आयकर कागदपत्रे सादर केलीत. त्यातून पतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा कमी नसल्याचे स्पष्ट झाले. ही बाब लक्षात घेता पत्नी १० हजार रुपये पोटगीसाठी पात्र असल्याचा निष्कर्ष नोंदवून पतीचा अर्ज फेटाळून लावला. (प्रतिनिधी)