शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पवारांकडून पराभवाचा पंचनामा

By admin | Updated: November 19, 2014 04:59 IST

लोकप्रतिनिधींचा कमी झालेला संपर्क, नेत्यांवर झालेले प्रचंड आरोप, मध्यमवर्गीय मतदारांनी पक्षाकडे फिरविलेली पाठ

चोंढी (अलिबाग) : लोकप्रतिनिधींचा कमी झालेला संपर्क, नेत्यांवर झालेले प्रचंड आरोप, मध्यमवर्गीय मतदारांनी पक्षाकडे फिरविलेली पाठ आणि मुस्लीम-दलित-आदिवासी-धनगर समाजाने योग्य साथ न दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचा पंचनामा आज केला.पराभवाचे चिंतन आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी आयोजित पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, विदर्भ, मुंबई शहर आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत अपेक्षित यश मिळाले नाही. जळगावमध्ये ४वरून एका आमदारावर आलो. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आमचे एक आमदार जेलमध्ये होते. त्या प्रतिमेचा फटका बसला.धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादीचा विरोध नव्हता पण तसे चित्र निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले. मध्यमवर्गीयांची संख्या अधिक असलेल्या मुंबई, पुणे, नागपुरात आम्हाला मोठा फटका बसला. आघाडी ऐनवेळी तुटली तरी स्वबळावर लढण्याची शक्यता तपासून आम्ही तशी तयारी करून ठेवायला हवी होती पण तसे घडले नाही. पक्षाच्या आमदार, खासदारांनी आपल्या मतदारसंघाव्यतिरिक्त एका मतदारसंघात पक्षवाढीच्या दृष्टीने लक्ष घालावे, असे आदेश पवार यांनी दिले. आ. राहुल नार्वेकर यांच्या अलिशान रिसोर्टवर बैठकीची व्यवस्था आहे. नेत्यांच्या मनोरंजनासाठी रात्री ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ही झाला. गेल्या वेळी राष्ट्रवादीची बैठक येथेच एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झाली होती. (विशेष प्रतिनिधी)