शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटल्या!

By admin | Updated: July 21, 2014 02:48 IST

शरद पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटून त्यावर विद्या प्रतिष्ठानसारख्या संस्था उभ्या केल्याचे टीकास्त्र रविवारी येथील जाहीर सभेत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले.

बार्शी : शरद पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटून त्यावर विद्या प्रतिष्ठानसारख्या संस्था उभ्या केल्याचे टीकास्त्र रविवारी येथील जाहीर सभेत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले. उद्धव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरही टीकेची झोड उठविली. भगवंताच्या बार्शीतला भगवा राज्यात फडकवा, असे आवाहन त्यांनी केले.सत्तेत असताना शरद पवारांनी कधीही दुष्काळग्रस्तांसाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी आपले वजन वापरले नाही. पण मोदी सत्तेवर येताच राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पंतप्रधानांना सांगण्यासाठी भेटल्याचे सांगून आपले फोटो ते छापून आणत आहेत. सत्ता असताना महाराष्ट्राचे भले का केले नाही? असा सवाल करतानाच उद्धव यांनी दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांऐवजी पवारांना राज्यात २६ लवासासारखे प्रकल्प उभे करण्यास जास्त रस असल्याचा आरोप केला. गरिबांविषयी त्यांना कळवळा नाही. तर ‘हिल स्टेशन’ उभारण्यात त्यांना धन्यता वाटते, अशीही टीका त्यांनी केली.शिवसेना सोडून गेलेले तडफडत आहेत. त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. शिवसेनेमध्ये प्रेम आहे, असे सांगत सत्ताधाऱ्यांची पैशांची मस्ती वाढत आहे. त्यामुळे आपले सरकार येणारच आहे. विरोधकांना उमेदवार शोधावे लागत आहेत, असा टोला त्यांनी लागावला. स्वीट डिशची काळजीगेल्या १५ वर्षांपासून आघाडी सरकारने खाण्याचेच काम केले आहे. सिंचनावर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र त्याचा परिणाम किती झाला हे दिसत नाही. अजित पवारांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वीट डिशची चिंता जास्त आहे, असा टोला त्यांनी लगावला. नारायण राणे यांची सद्दी संपली असून त्यांना अस्तित्वासाठी सध्या लढावे लागत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)