शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

वेगळ्या विदर्भाच्या मुद्याला तूर्तास विराम द्या - मुख्यमंत्र्यांनी ठणकावले

By admin | Updated: August 2, 2016 12:31 IST

भाजपाने छोट्या राज्यांची आपली भूमिका कधीच लपवली नाही, मात्र तूर्तास सरकारसमोर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या कोणताही प्रस्ताव मांडण्यात आलेला नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ -  भारतीय जनता पक्षाने छोट्या राज्यांची आपली भूमिका कधीच लपवलेली नाही, मात्र तूर्तास सरकारसमोर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या कोणताही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मुद्याला तूर्तास विराम द्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा चांगलाच गाजत असून आजही या मुद्यावरून सभागृहात गदारोळ माजला. शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या तर शिवसेनेने विधानभवनाच्या पाय-यांवरही आंदोलन केले. तसेच या मुद्यावर मुख्यमंत्री व भाजपाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. 
मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आलेलाच नाही. तो निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही, तर केंद्राचा असतो. भाजपाने छोट्या राज्यांची भूमिका कधीही लपवलेली नाही, तसेच शिवसेनेनेही अखंड महाराष्ट्राची भूमिका कधीच सोडलेली नाही. मात्र सत्तेत आम्ही युतीचे सरकार म्हणून एकत्र असलो, तरी तरी वेगळ्या विदर्भाचा प्रस्तावाच नसल्यामुळे, ही चर्चा इथेच थांबवावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. 
 
मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
 
भाजपची छोट्या राज्यांची भूमिका असली, तरी मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेय तसेच माझा राजीनामा मागण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटलांना नाही, असंही ते म्हणाले. आम्ही तुमच्या मेहेरबानीवर निवडून आलेलो नाही, आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे. त्यामुळे आमचा राजीनामा मागण्याचा हक्क जनतेला आहे, तुम्हाला नाही, असा शब्दांत त्यांनी विरोधकांना ठणकावले.