शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

अपयशाचा मार्ग जातोय मृत्यूच्या दारात

By admin | Updated: January 21, 2015 23:15 IST

वर्षभरात सरासरी ४० पेक्षा जास्त आत्महत्या : जाच, मनाविरुद्ध होणाऱ्या घटनामुळे शेवट; सामाजिकदृष्ट्या चिंताजनक

एकनाथ पाटील - कोल्हापूर -पैसा टाका आणि झटपट यश मिळवा, या आमिषापोटी तरुण-तरुणींच्यामध्ये स्पर्धा वाढली असून, त्यामध्ये अपयश आल्यास ते आत्महत्येकडे वळतात, असा निष्कर्ष तज्ज्ञांच्या अभ्यासामधून पुढे येत आहे. अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामध्ये युवावर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. नवविवाहिता, शाळकरी मुले, तरुण शेतकरी, उच्चशिक्षित नोकरदारवर्गही याला अपवाद नाही. ‘आत्महत्या’ हा चिंतेचा प्रश्न समाजासमोर बनला असून, वर्षभरात सरासरी ४० आत्महत्या पोलीस दप्तरी नोंद झाल्या आहेत. आजकाल प्रसारमाध्यमे आणि सुलभ देवाण-घेवाणीमुळे कॉलेज तरुण-तरुणींमध्ये एकवेगळ्या प्रकाराचे वातावरण निर्माण झालेले दिसते. पुस्तकांपेक्षा ते मोबाईलवर चॅटिंग करण्यात धन्यता मानतात आणि त्यातूनचे मैत्री, प्रेम वाढत जाते आणि नको इतक्या प्रमाणात ते स्वत:ला वाहून घेतात. त्यातूनच एकतर्फी प्रेमाचा किंवा घरच्यांचा विरोध अशा गोष्टींमुळे तरुण-तरुणी निराशेत जातात आणि आत्महत्येकडे वळतात. उच्चशिक्षित युवकांचेही आत्महत्येचे प्रमाण तितक्याच प्रमाणात वाढत आहे. काही युवक स्वाभिमान दुखावल्याच्या नैराश्येतून टोकाची भूमिका घेतात, तर काही व्यवसायात, नोकरीत थोड्याश्या आलेल्या अपयशानेही स्वत:चे जीवन संपवितात. सध्या इंटरनेटचे युग असल्याने प्रत्येक गोष्ट हायटेक बनत चालली आहे. मोबाईल, व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, टीव्ही चॅनेल, आदींच्या वापरामुळे जीवनही तितक्याच गतीने चालले आहे, अशी भावना प्रत्येक व्यक्तीत निर्माण होत आहे.नवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधले असता सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशांची मागणी, त्याचबरोबर शिक्षणामुळे वाढलेल्या त्यांच्या अपेक्षा त्यांची पूर्तता न झाल्याने आलेले नैराश्य आणि अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात. समज येण्याच्या अगोदरच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजकालच्या मुलांच्यामध्ये तीव्र बनला आहे. आयुष्य म्हणजे फक्त मजामस्ती आणि आनंद उपभोगणे एवढेच त्यांना माहितीआहे. त्यासोबत काही जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि कष्ट असते याची कल्पनाच नसते. त्यामध्ये पालकही त्यांना त्या जबाबदारीची जाणीव करून देताना दिसत नाहीत. वर्षभरात--४० आत्महत्यापालकही हतबललहान मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांच्या स्वभावामध्ये आयुष्याबद्दल एक न्यूनगंड तयार झाला आहे. मग त्यात आई-वडील अभ्यास कर म्हटले अथवा एखादी चैनीची गोष्ट द्यायला नकार दिला, तर ती मुले किंवा तरुण घरातून पळून जाण्यापासून आत्महत्येपर्यंतचा विचार करतात. त्यामुळे आजकालचे पालक मुलांना समजवायला किंवा बोलायला घाबरतात आणि हा एक जागतिक प्रश्न बनत चालला आहे, की मुलांवर संस्कार करायचे तरी कसे ? त्यामुळे पालक हतबल झाले आहेत. युवक-युवतींना सध्या भौतिक सुखाचा हव्यास मोठ्या प्रमाणात जडला आहे. सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी कशा हाताळल्या पाहिजे याचे ज्ञान नाही. स्वत:च्या भावनांना आवर घालण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. त्यामुळे भावनिक बुद्धांक कमी झाल्याने त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यांची क्षमता वाढविण्यामध्ये प्रौढवर्ग कमी पडत आहे. - डॉ. शुभदा दिवाण, समुपदेशक जीवन हे प्रत्येकासाठी अनमोल आहे. जीवनामध्ये एखादे अपयश किंवा नैराश्य आले तरी खचून न जाता येणारा दिवस आपला आहे, असे समजून ओढावलेल्या संकटांवर मात करायला शिकले पाहिजे. आत्महत्येच्या पर्यायाने सगळे प्रश्न सुटतात असे नाही, तर ते वाढतात व गुंतागुंतीचे बनतात आणि आपल्याच कुटुंबाला त्याचा आयुष्यभर त्रास होतो. - प्रणाली प्रवीण पाटील (कोडोली) संशय, संपत्ती, अपेक्षाभंग ठरते कारणनवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधले असता सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशांची मागणी, त्याचबरोबर शिक्षणामुळे वाढलेल्या त्यांच्या अपेक्षा त्यांची पूर्तता न झाल्याने आलेले नैराश्य आणि अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात.