शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ताकई फाटा ते ताकई रस्त्यावर खड्डे

By admin | Updated: October 20, 2016 03:21 IST

खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई फाटा ते ताकई गावापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले

वावोशी : खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई फाटा ते ताकई गावापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले, परंतु काही दिवसातच रस्त्यावर खड्डे पडल्याने याबाबतची तक्र ार नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. मात्र या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने तीन महिन्यांतच ९० लाख खर्च करून बनविलेल्या ताकई रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. तर अनेक अपघाताची मालिका सुरू आहे, त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांनी आक्र मक भूमिका घेतली आहे. मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांची काही तरु णांनी भेट घेऊन रस्त्याची लवकर दुरु स्ती करण्याची मागणी के ली आहे.संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करून, त्यांना काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नगराध्यक्ष दत्ता मसूरकर यांच्याकडे यापूर्वी करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्यावेळी ताकई येथील ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे भरणार का? असा प्रश्न उपस्थित केला असता नगराध्यक्ष मसूरकर यांनी आम्ही आयआरबीशी चर्चा करून त्यांच्याकडील सिमेंट मटेरियल घेणार असून त्यानुसार शहरात पडलेले सर्व खड्डे यातून भरण्यात येणार आहेत, याची सुरुवात ताकई रस्त्यापासून करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानुसार फसवाफसवीचा खेळ खेळत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले, परंतु खड्डे बुजलेच नाहीत. त्यामुळे पुन्हा नगर पालिका शिक्षण मंडळाचे सभापती जयवंत पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अतुल पाटील, डॉ.हेमंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील आदींसह तरुणांनी मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांची भेट घेतली. आचारसंहिता लागू झाल्याने काँक्र ीटीकरण होईल का? पुन्हा खड्ड्यांचा सामना करावा लागेल, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.>रस्ता दुरु स्तीचे आश्वासनरस्त्याचे काम कधी करणार असे विचारले असता रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश अभियंता जाधव यांना दिले असून आपल्या हद्दीतील रस्त्यावर खड्डे परिसरामधील कारखान्यातील अवजड वाहनांमुळे होत असल्याने त्यांच्याशी चर्चा करून काही मदत मिळते का ते बघू तसेच काँक्र ीटीकरणासाठी प्रस्ताव पाठविला असून येत्या तीन महिन्यात रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काँक्र ीटीकरण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.