शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस जास्त पडल्याने खड्डे अधिक

By admin | Updated: October 20, 2016 05:56 IST

पावसाळी दिवस वाढल्यामुळे खड्डे अधिक वाढल्याचा आयुक्त अजय मेहता यांचा दावा, सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्यांनी आज निमूट मान्य केला.

मुंबई : पावसाळी दिवस वाढल्यामुळे खड्डे अधिक वाढल्याचा आयुक्त अजय मेहता यांचा दावा, सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्यांनी आज निमूट मान्य केला. यामुळे खड्ड्यांवरून सुरू असलेले रस्त्यावरील राजकीय आंदोलन म्हणजे, निवडणुकीची तयारीच असल्याचे बोलले जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जाते. यंदा मात्र, रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट आहे. त्यात पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने, राजकीय पक्षांसाठी खड्डे हाच ज्वलंत विषय ठरला आहे. पावसाळा थांबला, तरी खड्डे कायम असल्याने आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याची तयारी विरोधी पक्षांच्या मदतीने शिवसेनेने सुरू केली होती. मात्र, आयुक्तांनी कामाची पाहणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला माघार घ्यावी लागली आहे. मात्र, खड्डेप्रकरणी स्थायी समितीमध्ये निवेदन करताना आयुक्तांनी आपल्या बचावाचा मार्ग मोकळा केला. मुंबईत १ ते १० आॅक्टोबरपर्यंत पाऊस असल्याने खड्डे भरता आले नाहीत. असा बचाव आयुक्तांनी केला. (प्रतिनिधी)>असा सुरू झाला खड्ड्यांचा वाद मुंबईचे रस्ते खड्ड्यात असताना प्रशासनाच्या हास्यास्पद आकडेवारीने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. मुंबईत केवळ ३५ खड्डे असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केल्यामुळे, सर्वच स्तरातून नाराजीचे सूर उमटू लागले. मुंबईतील खड्डे अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी मनसेने रस्ते विभागाच्या प्रमुख अभियंत्याच्या हातात, ‘मी या खड्ड्यांसाठी जबाबदार’ असल्याचे फलक देऊन रस्त्यावर उभे केले. याच्या निषेधार्थ अभियंत्यांनी काम बंद आंदोलन पुकारले.