शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

राज्यातील साडेपाच हजारांवर कैद्यांना पॅरोल, फलरेचा दे धक्का!

By admin | Updated: October 13, 2016 03:04 IST

कैद्यांना पॅरोल आणि फलरेची सुट्टी न देण्याचा शासनाचा निर्णय; साडे पाच हजारांवर कैद्यांना फटका.

सचिन राऊत अकोला, दि. १२- दहशतवादी कृत्य, दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, अमली पदार्थांंची तस्करी यासह बलात्कार, खून यासारख्या गुन्हय़ांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोल आणि फलरेची सुट्टी न देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राज्यातील कारागृहात असलेल्या साडे पाच हजारांवर कैद्यांना याचा फटका बसला आहे. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना मुलगा-मुलीचा विवाह, जवळच्या नातेवाइकांचा मृत्यू यासारख्या कारणांमुळे कैद्यांना पॅरोल आणि फलरे या रजा मंजूर करण्यात येतात; मात्र या कैद्यांना पॅरोल व फलरे दिल्यानंतर गंभीर गुन्ह्यांतील कैदी कारागृहात परत आलेच नसल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. अकोल्यात गत सहा महिन्यांत अशा प्रकारची पाच प्रकरणे उघडकीस आली असून, हे कैदी अमरावती आणि नागपूर कारागृहातून सुटी घेतल्यानंतर परतच गेले नव्हते, त्यामुळे कैद्यांना दिल्या जाणार्‍या या सुट्टय़ांबाबत सरकारने धोरण आणखी कडक केले आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक बसविण्यासाठी बलात्कार, खून, दरोडा, लहान मुलांचे अपहरण, मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी व दहशतवादी कृत्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फलरेची सुट्टी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या पाच हजार ८00 कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फलरेची सुटी मिळणार नाही. राज्यातील कारागृहात खून प्रकरणात ५ हजार २00 कैदी शिक्षा भोगत असून, बलात्काराच्या गुन्ह्यांत २३६, दरोड्याच्या गुन्ह्यांत १२३ आणि अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत ८४ कैदी शिक्षा भोगत आहेत. यासोबतच दहशतवादी कृत्य व लहान मुलांच्या अपहरणात सुमारे पन्नास कैदी शिक्षा भोगत आहेत.

गुन्हे आणि कैद्यांची संख्याखून -         ५ हजार २00बलात्कार -  २३६ दरोडा -       १२३अमली पदार्थ तस्करी - ८४दहशतवादी कृत्य आणि अपहरण -५0पाच वर्षांंपर्यंंत शिक्षा झालेल्यांना दिलासाराज्य सरकारने पॅरोल व फलरेची सुट्टी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षांपयर्ंत शिक्षा झालेल्या कैद्यांना नात्यातील व्यक्ती आजारी असेल, तसेच मुला-मुलींच्या लग्नासाठी पूर्वी तीस दिवसांची पॅरोलची सुट्टी दिली जात होती. कैद्यांना ही सुट्टी ९0 दिवसांपयर्ंत वाढवून घेणे शक्य होते; पण आता पॅरोल सुट्टीची कमाल र्मयादा ९0 दिवसांवरून ६0 दिवस आणि फलरेची २८ दिवसांवरून २१ दिवसांवर आणण्यात आली आहे. आपत्कालीन पॅरोल सात दिवसांची !कारागृहातील सर्व कैदी आपत्कालीन पॅरोलसाठी पात्र असतील. आई, वडील, मुलगा, पत्नी, भाऊ, बहीण यांचा मृत्यू, यांच्यापैकी कोणी गंभीर आजारी असेल तसेच भाऊ, बहीण आणि मुलगा यांच्या विवाहासाठी कैद्यांना आपत्कालीन पॅरोल दिला जाईल. हा पॅरोल सात दिवसांसाठीचा असेल. त्यामध्ये वाढ होणार नाही.न्यायालयात प्रलंबित खटल्यातील साडेसात हजारात कैदीही कैचीतबलात्कार, खून, दरोडा, लहान मुलांचे अपहरण, मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी व दहशतवादी कृत्यात गुन्हा दाखल असलेल्या राज्यातील साडेसात हजार गुन्हेगारांनाही या निर्णयाचा फटका बसणार असल्याची माहिती आहे. या कैद्यांनादेखील आता यापुढे पॅरोल आणि फलरेच्या सुट्टीचा लाभ मिळणार नाही. अशा प्रकारच्या विविध गुन्हय़ात साडेसात हजार कैद्यांवर न्यायालयामध्ये खटले सुरू आहेत. यामध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांनादेखील या सुट्टीचा लाभ मिळणार नाही.