शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटीवर शिक्कामोर्तब; यवतमाळ जि. प.तील भरती परीक्षा रद्द

By admin | Updated: November 5, 2014 00:57 IST

जिल्हा परिषदेतील पदभरती घोटाळ्यातील पेपरफुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तारतंत्री या चार

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील पदभरती घोटाळ्यातील पेपरफुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तारतंत्री या चार संवर्गातील पदांसाठी घेतलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी मंगळवारी घेतला. दरम्यान, औरंगाबाद पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांची दुपारी तब्बल दीड तास चौकशी केली. पेपरफूटप्रकरणी जिल्हाधिकारी महिवाल यांनी परीक्षा रद्द केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यवतमाळ जिल्हा परिषदेतील चार संवर्गासाठी २ नोव्हेंबरला लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर आपण स्वत: १ नोव्हेंबरला मध्यरात्री तयार केला. हा पेपर औरंगाबाद येथे फुटल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता फॅक्सद्वारे दिली. याप्रकरणी मंगळवार दि. ३ नोव्हेंबरला औरंगाबादचे पोलीस पथक यवतमाळात आले. त्यांनी आरोपींकडून जप्त केलेल्या उत्तरपत्रिकेची माहिती दिली. या प्रकरणासंदर्भात लेखी जबाबही घेतले. पोलिसांनी दिलेल्या उत्तरपत्रिकेशी विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता आणि तारतंत्री यांच्या उत्तरपत्रिका जुळत असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा निवड समितीच्या उत्तरपत्रिकेसोबत आरोपींजवळची उत्तरपत्रिका ७० टक्के मिळतीजुळती असल्याचे आढळले आहे. मात्र पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेली मूळ उत्तरपत्रिका दिलेली नाही. त्याची प्रत द्यावी, अशी लेखी मागणी आपण दुसऱ्यांदा करणार आहे. जिल्हा निवड समितीचा पेपर लिक झाल्याचे दिसून येते. जाहीर झालेल्या निकालामध्ये विस्तार अधिकारी संवर्गातील दोन विद्यार्थ्यांना २०० पैकी १६६ आणि १४२ असे गुण मिळाले आहेत. कनिष्ठ अभियंता या पदासाठी उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले ४५ टक्के म्हणजे २०० पैकी ९० गुणही कुणी घेतलेले नाही. यावरून नेमका पेपर फुटला की नाही असाही संभ्रम निर्माण होतो. मात्र उत्तरपत्रिका मिळतीजुळती असल्याने ही परीक्षा रद्द केली आहे. उर्वरित १० पदांसाठी असलेली परीक्षा ८ नोव्हेंबरपासून सुरळीत घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी महिवाल औरंगाबादमध्ये सीईओ असताना त्यांच्या संपर्कातील व्यक्तीने चुकीचा वापर केल्याची शक्यता आहे काय, असे विचारले असता याबाबत तपासणी केली जाईल, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, प्रभारी माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते.