शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्या प्रकरण, समीर गायकवाडला हवे सनातनचे ‘गोमूत्र’

By admin | Updated: February 6, 2017 19:57 IST

संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला सुरक्षेअभावी सोमवारी न्यायालयात हजर करण्यास कारागृह अधीक्षकांनी असमर्थता दर्शविली.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 6 - ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला सुरक्षेअभावी सोमवारी न्यायालयात हजर करण्यास कारागृह अधीक्षकांनी असमर्थता दर्शविली. संशयित आरोपी समीर गायकवाड याला ‘सनातन’चे गोमूत्र आणि अगरबत्ती देण्याची त्याच्या वकिलांची मागणी न्यायाधीशांनी फेटाळली. त्यास फक्त जपमाळ देण्यासच परवानगी देण्यात आली. याबाबतची पुढील सुनावणी दि. २८ फेब्रुवारीला होणार आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर ही येथील न्यायसंकुलामध्ये सुनावणी सुरू आहे. दुपारी तीनच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. तत्पूर्वी सकाळी तपासी अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या खटल्यातील तपासासंदर्भातील अहवाल व संशयित आरोपींच्या वकिलांच्या मागणी अर्जावरील आक्षेपाचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीत पोलीस बंदोबस्त पुरविल्यामुळे संशयित आरोपीला पोलीस बंदोबस्त मिळणार नसल्याने पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे अपुऱ्या पोलीस बंदोबस्ताअभावी समीर गायकवाड व डॉ. वीरेंद्र तावडे यांना न्यायालयात हजर करू शकत नसल्याचेही कारण न्यायालयास सांगितले. आरोपीच्या वकिलांनी समीर गायकवाड याला पोटविकाराचा त्रास असल्याने प्रभावी औषध म्हणून ‘सनातन’चे गोमूत्र, ध्यानधारणेसाठी अगरबत्ती आणि जपमाळ देण्याची मागणी केली. या मागणीवर सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी आक्षेप नोंदवला. या वस्तू प्रयोगशाळेतून रासायनिक पृथक्करणानंतरच देण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. जपमाळ देण्याबाबत मात्र राणे यांनी सहमती दर्शविली. अचानक पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्याने संशयित आरोपीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची मागणी करता आली नसल्याचे कारागृह अधीक्षक शेळके यांनी सांगितले; पण डॉ. वीरेंद्र तावडेला न्यायालयात हजर करता येत नसेल तर किमान आठ दिवस अगोदर व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी न्यायालयात अर्ज करावा, असेही न्यायाधीशांनी सुनावले. समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे यांच्याबाबत न्यायालयात बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची बँक खाती व झालेल्या पत्रव्यवहाराची पुढील सुनावणीवेळी मागणी करणार असल्याचे आरोपींचे वकील अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले. न्यायालयात सादर झालेल्या आरोपपत्रात, अ‍ॅड. पानसरे हे सोशीत आणि पीडितांसाठी काम करत होते, असे म्हटले आहे, त्यामुळे त्यांच्याकडून काही जण दुखावले गेल्याची शक्यता आहे, त्यातूनच काही दुखावले गेलेल्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील सुनावणीवेळी कागदपत्रे मागणीचा अर्ज देणार असल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले. समीर गायकवाडचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी ‘सनातन’चे गोमूत्र, अगरबत्ती व जपमाळ देण्याची मागणी केली; पण या वस्तू कारागृहाच्या नियमात बसत नसल्याचे सांगून कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी कोणत्या कंपनीच्या कोणत्या वस्तू देता येतात याची यादीच वाचून दाखविली. साहित्य न्यायालयात हजर संशयिताचे वकील समीर पटवर्धन यांनी गायकवाड याच्या मागणीनुसार सनातन कंपनीचे गोमूत्र, अगरबत्ती व जपमाळ देण्यासाठी न्यायाधीशांसमोर हजर केली. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्या वस्तूंची पाहणी करत जपमाळ वगळता दोन्हीही वस्तूंचा रासायनिक पृथक्करणानंतर विचार करू, असे न्यायाधीशांनी सांगितले. उच्च न्यायालयात आज सुनावणी समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे यांच्यावर आरोपनिश्चिती संदर्भात उच्च न्यायालयात स्थगिती आहे. त्याबाबत आज, मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे.