शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

पंकज भुजबळ यांना दिलासा नाही

By admin | Updated: July 14, 2016 03:56 IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने आमदार पंकज भुजबळ यांच्याविरुद्ध जारी केलेले अटकपूर्व वॉरंट रद्द करण्यास बुधवारी

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने आमदार पंकज भुजबळ यांच्याविरुद्ध जारी केलेले अटकपूर्व वॉरंट रद्द करण्यास बुधवारी उच्च न्यायालयाने नकार दिला. आतापर्यंत तपास यंत्रणांच्या हाती न आलेल्या पंकज भुजबळ यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांच्यासह ४५ जणांवर विशेष पीएलएमए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. हे वॉरंट रद्द करण्यात यावे व गुन्हाही रद्द करण्यात यावा, यासाठी पंकज भुजबळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. पंकज भुजबळ यांनी विशेष न्यायालयात वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज करावा आणि सुनावणीसाठी उपस्थित राहावे. मात्र, अर्ज फेटाळण्यात आला, तर सक्तवसुली संचालनालय (ईडी) त्यांना तातडीने अटक करणार नाही, असे आश्वासन ईडी देणार का? अशी विचारणा खंडपीठाने केल्यावर ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी पंकज भुजबळांना अटक न करण्यासंदर्भात कोणतेही आश्वासन देण्यास नकार दिला. अर्ज फेटाळल्यास तपास यंत्रणा अटक करेल, असे अ‍ॅड. वेणेगावकर यांनी सांगितले. मात्र, चमनकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने त्याच पार्श्वभूमिवर उच्च न्यायालय पंकज भुजबळांना दिलासा देऊ शकते, असा युक्तिवाद भुजबळांच्या वतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी खंडपीठापुढे केला.‘न्यायालयाने चमनकर यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात आम्ही बदल करणात नाही. त्यामुळे यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. तुम्हीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता,’ असे म्हणत खंडपीठाने भुजबळांविरुद्धचे वॉरंट रद्द करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)