शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामप्रदक्षिणा करून पालखी मार्गस्थ

By admin | Updated: July 4, 2016 01:49 IST

श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा यवत येथील मुक्काम आटोपून सकाळी आठच्या सुमारास मार्गस्थ झाला.

यवत : विठुनामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर चाललेला श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा यवत येथील मुक्काम आटोपून सकाळी आठच्या सुमारास मार्गस्थ झाला. तत्पूर्वी यवत गावात पालखीची ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आरती करण्यात आली.रिमझिम पावसाच्या सरींमध्ये यवतमध्ये शनिवारी (दि. २) पालखी सोहळा यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात मुक्कामी होता. पालखी सोहळा मुक्कामी असताना मागील एक महिन्यापासूनओढ दिलेल्या वरुणराजाने परिसरात रात्रभर जोरदार हजेरी लावली. रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग चांगलाच सुखावला. मात्र मुक्कामी असलेल्या वारकरीवर्गाची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, यवत पंचक्रोशीतील गावांमधून पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी येऊन रांगा लावून दर्शन घेतले.भांडगाव येथे पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भांडगावच्या सरपंच कमल टेळे, उपसरपंच रवींद्र दोरगे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मधुकर दोरगे, माजी उपसरपंच लक्ष्मण काटकर, लक्ष्मण दोरगे, बाळासाहेब दोरगे, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, संग्राम ढोणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)।पावसात केल्या वारकऱ्यांनी अंघोळी...यवत मुक्कामी संत तुकाराममहाराज पालखी सोहळा असताना पहाटे ३ वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस सकाळपर्यंत सुरू होता. यामुळे रात्रीची झोपमोड झाली असली तरी दुष्काळामुळे त्रासलेल्या वारकरीवर्गाने पावसाच्या पाण्यात अंघोळ करण्याचा अनोखा आनंद घेतला, तर पालखीच्या आगमनाबरोबर पावसाचेदेखील जोरदार आगमन झाल्याने परिसरातील शेतकरीवर्गाला चांगलाच दिलासा मिळाला.