शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पालघरचा विकास आराखडा मराठीत करा!

By admin | Updated: January 19, 2017 03:37 IST

हरकती नोंदविण्यासाठी तो मराठीत प्रसिद्ध करण्यात यावा, अशी मागणी मनसे च्या उपजिल्हाध्यक्षानी नगररचना विभागाकडे केली आहे.

हितेन नाईक,

पालघर-  शहराचा प्रारूप विकास आराखडा हा बिल्डर धार्जिण्या आणि स्थानिक गरीब रहिवासी, शेतकरी यांच्यावर अन्याय करणारा असल्याने त्यावर हरकती नोंदविण्यासाठी तो मराठीत प्रसिद्ध करण्यात यावा, अशी मागणी मनसे च्या उपजिल्हाध्यक्षानी नगररचना विभागाकडे केली आहे.पालघर नगर परिषदेचा प्रारूप विकास आराखड्यातील जमीन वापर नकाशा हा प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता बनविण्यात आला होता. तसेच आराखड्यात आरक्षणे टाकताना ती लहान शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकून बिल्डरांच्या जमिनी मात्र यातून बेमालूमपणे वगळण्यात आल्या होत्या. हा आराखडा तयार होत असताना २ ते ५० एकरच्या गृहसंकुलना मनमानीने परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ प्रारूप विकास आराखडा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने विरोध केला जात होता. हा आराखडा शेतकरी व ग्रामस्थांवर अन्याय करणारा असल्याने तो रद्द करावा यासाठी टेभोंडे, अल्याळी, नवली, वेवूर, घोलविरा, गोठणपूर व परिसरातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नगर रचना कार्यालयावर मोर्चे काढले होते. हा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा यासाठी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विधानसभेत आवाज उठविला तसेच स्थानिकांचा वाढता विरोध पाहता मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन समितीला दिले होते. मात्र त्यांनीही या आराखड्याला १७ ते २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात मंजूरी दिल्याने लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रि या उमटल्या. यावर एका महिन्याच्या आत हरकती व सूचना मागविण्यात आल्याचे सांगून त्याचे नकाशे जनतेच्या अवलोकानार्थ नगरपरिषद व नगररचना कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्याचे नमूद केले होते. मात्र प्रत्यक्षात जानेवारी संपत आला तरी त्या ठिकाणी नकाशा व अधिसूचना लावण्यात न आल्याचे आढळून आले.त्यावेळी शेतकऱ््यांनी त्याबाबत विचारणा केली असता नकाशाच उपलब्ध झाला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले.हा वादग्रस्त ठरलेल्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्या नंतर नकाशा व अधिसूचना या इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणार आहे. गाव पाड्यात, खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना, स्थानिकांना इंग्रजीचे ज्ञान नसल्याने त्यांना हरकती नोंदविणे अडचणीचे ठरणारे आहे. त्याचा गैरफायदा बिल्डर, धनदांडगे घेण्याची शक्यता असल्याने तो मराठीत प्रसिद्ध करावा, अशी मागणी जिल्हाउपाध्यक्ष आशिष मेस्त्री आणि सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी आणि नगर रचनाकार थोरात यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)