शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील गोदामात स्फोटकांचा साठा जप्त

By admin | Updated: October 28, 2016 02:18 IST

मुंबई - अहमदाबाद महामार्गालगत सातिवली गावाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडक्या इमारतीत स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा दडवून

- हितेन नाईक/आरिफ पटेल, पालघरमुंबई - अहमदाबाद महामार्गालगत सातिवली गावाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडक्या इमारतीत स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा दडवून ठेवल्याची माहिती कळताच मुंबईतील काळाचौकी येथील दहशतवादविरोधी पथकाने छापा घालून डिटोनेटर, जिलेटीनच्या कांड्या अशी १४ ते १५ किलो वजनाची स्फोटके हस्तगत केली. या साठ्यामुळे येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवादी पथकाने ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने पालघर जिल्ह्यातील महामार्गालगतच्या सातिवली गावाच्या हद्दीत निर्मनुष्य ठिकाणी या गोदामात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती दिली होती. त्याआधारे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी ७ वाजता या पडक्या इमारतीच्या परिसरात पोहोचले. त्यावेळी लहान लहान पाकिटांमध्ये ही स्फोटके खड्डे खणून दडविल्याचे आढळले. मात्र याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.दहशतवादी पथकाचे मुंबई युनिटचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी, अधिक्षिका शारदा राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अशोक होनमाने आदींसह सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी शोध घेत होते. बेकायदेशीर गोदामे धोकादायकआजवर अनेक स्फोटकांचा यशस्वी शोध घेणाऱ्या पोलिसांच्या श्वानपथकातील लकी आणि मोती या श्वानांनी हा साठा शोधला.नवनिर्मित पालघर जिल्ह्यात प्रथमच बेवारस स्फोटके सापडल्याने हा जिल्हा दहशतवाद्यांच्या कारवाईचे लक्ष्य करण्याचा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रीय महामार्गालगत आदिवासी तसेच खाजगी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोदामे उभारण्यात आली असून त्यातून अनेक प्रकारची बेकायदेशीर कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे घातपाती कारवायांसाठी अशा गोदामांचा वापर केला जात असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.सहा महिन्यांपासून साठा दडविलामनोर पोलीस ठाण्याच्या वरई चौकीपासून सातिवलीमधील हे गोदाम अवघ्या ६०० फुटांवर असून त्या चौकीवर २४ तास पहारा असतानाही ही स्फोटके उतरवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा साठा दडविल्याचे समजते. त्यामुळे महामार्गालगतच्या पडक्या इमारती, अनधिकृत ढाबे, गोदामे यामुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोदामात मागील अनेक महिन्यांपासून काही जणांचे वास्तव्य असल्याचे घटनास्थळावरील दगडाच्या चुली, ब्लँकेट्स, जुने कपडे यावरून स्पष्ट होते.