शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करता येईल

By admin | Updated: May 21, 2017 00:22 IST

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतरही पाकिस्तानची आडमुठी भूमिका कायम राहत असेल तर भारताला मुत्सद्देगिरीचा परिचय देऊन पाकची

- नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतरही पाकिस्तानची आडमुठी भूमिका कायम राहत असेल तर भारताला मुत्सद्देगिरीचा परिचय देऊन पाकची चहूबाजूने कोंडी करावी लागेल, असे मत सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी मांडले.कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देणारा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी दिला. त्यावर प्रतिक्रिया नोंदविताना, पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज आलम यांनी, ‘हा निकाल आम्हाला बंधनकारक नाही,’ अशी दर्पोक्ती केली. त्यामुळे आता भारताला कोणते पर्याय उपलब्ध आहेत, ते जाणून घेण्यासाठी लोकमतने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी विशेष चर्चा केली. या वेळी अ‍ॅड. निकम यांनी या निकालाच्या आणि भारतासमोरच्या पर्यायाचे विश्लेषण केले.अ‍ॅड. निकम म्हणाले, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल हा आर्टिकल (कलम) ९४नुसार संयुक्त राष्ट्राच्या सभासद देशांकरिता बंधनकारक आहे. तरीसुद्धा पाकने कुलभूषण प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा असल्याचे सांगून या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीपुढे जावे लागेल. मात्र, या समितीपुढे जाण्याचा एक मोठा धोका आहे.हा धोका स्पष्ट करताना ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे जे पाच राष्ट्र कायमस्वरूपी सदस्य आहेत, त्यांना नकाराधिकार वापरण्याचाही अधिकार आहे. त्यामुळे यापैकी एका राष्ट्राने जरी नकाराधिकार वापरून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पाकविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज नाही, असे म्हटल्यास कुलभूषण प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकाल हा फक्त कागदी निकाल ठरेल.भारतासमोरील पर्याय...- पाकिस्तानला भारताने जो मोस्ट फेवरेशन (अतिशय जवळचा) देश म्हणून दर्जा दिला आहे तो तातडीने काढून घेता येईल. - पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी केली नाही, तर ‘इन्डूज वॉटर’ करारानुसार पाकिस्तानला भारताकडून केला जाणारा पाणीपुरवठा बंद करता येईल. - राजकीय मुत्सद्दी नेमून त्यांना अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, लंडन आदी देशांत पाठवून पाकिस्तानात न्यायाची कशी गळचेपी केली जाते, ते पटवून देता येईल. एका निरपराध भारतीय नागरिकाला खोट्या आरोपात फासावर टांगले जात आहे, हेदेखील लक्षात आणून देता येईल. - पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लादतानाच ट्रम्प सरकारकडेही त्यासंबंधाने आग्रह धरावा लागेल. - सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मर्यादित स्वरूपात लष्करी कारवाई भारताने करावी. जेणेकरून पाकिस्तानच्या आडमुठ्या धोरणाला ठोस उत्तर देता येईल आणि पाक लष्करामुळे येथील जनतेला कसा त्रास होत आहे, ते दाखवून देता येईल.वकिलाच्या नियुक्तीवरूनपाकिस्तानात यादवीया प्रकरणात पाकिस्तानच्या वतीने युक्तिवाद करणारे बॅरिस्टर कुरेशी कोण आहेत, या संबंधाने माहिती देताना ते म्हणाले, बॅरिस्टर कुरेशी लंडनमध्ये वकिली करतात. एन्रॉन प्रकरणात भारताची बाजू मांडण्यासाठी तत्कालीन भारत सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. त्या वेळी एन्रॉन प्रकरणात त्यांनी भारताच्या बाजूने युक्तिवाद केला होता. हा खटला हरल्यामुळे भारताला कोट्यवधींची नुकसानभरपाई द्यावी लागली होती. आता हेच बॅरिस्टर कुरेशी पाकिस्तानच्या वतीने कुलभूषण जाधव प्रकरणात युक्तिवाद करीत होते. या प्रकरणात नाक कापले गेल्यामुळे पाकिस्तानचे पित्त खवळले आहे. त्यामुळे बॅरिस्टर कुरेशी यांना पाकिस्तानच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी निवडण्याचा निर्णय कुणी घेतला, यावरून पाकिस्तानमध्ये यादवी माजली आहे. तेथील प्रसारमाध्यमांनीही जाहीररीत्या पाकिस्तान सरकारला विचारणा केली असल्याचेही अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.