शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलर्सच्या मालकाला पोलीस कोठडी

By admin | Updated: December 27, 2016 01:11 IST

चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या नेरूळ येथील एका प्रसिद्ध ज्वेलर्सचे मालक सुधीरकुमार अक्राकरम याला न्यायायलाने

नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या नेरूळ येथील एका प्रसिद्ध ज्वेलर्सचे मालक सुधीरकुमार अक्राकरम याला न्यायायलाने २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या त्याच्या पत्नीवर डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नेरुळ सेक्टर १८ येथील सागरदर्शन सोसायटीत राहणाऱ्या सुधीरकुमार याचे दागिन्यांचे दुकान आहे. त्याचे २००७ साली लग्न झाले असून, त्यांना तीन मुले आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून त्याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नीचे तिच्या बालपणीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. यावरून त्यांच्यात वाद होत होते. अखेर दोघांमध्ये घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण पोचले होते. त्यामुळे पती-पत्नीतील वाद मिटवून त्यांच्यातील गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने त्यांच्या नातेवाइकांनीही पुढाकार घेतला होता. त्यानुसार दोघा पती-पत्नीत दिलजमाई घडवून आणण्यासाठी २२ डिसेंबर रोजी दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तींनी सुधीरकुमारच्या घरी बैठक बोलाविली होती. ही बैठक दिवसभर चालली. अखेर रात्री चर्चा संपल्यानंतर सुधीरकुमार याने खासगीत बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला बेडरूममध्ये नेले. परंतु थोड्याच वेळात बेडरूममधून पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरात उपस्थित असलेल्या नातेवाइकांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी बेडरूममध्ये ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसून आली. सुधीरकुमारने नारळ सोलायच्या हत्याराने तिच्या डोक्यात व गळ्यावर वार केले होते. हा प्रकार पाहून भयभीत झालेल्या तिच्या नातेवाइकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)