शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिउष्णतेने राज्य होरपळले

By admin | Updated: May 19, 2016 05:39 IST

उष्णतेच्या तीव्र लाटेत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश होरपळून निघाला

नवी दिल्ली/मुंबई/पुणे : उष्णतेच्या तीव्र लाटेत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश होरपळून निघाला आहे. उष्माघाताने आठ जणांचा बळी गेला असून त्यामध्ये विदर्भातील चार आणि खान्देशातील चौघांचा समावेश आहे. विदर्भात दुपारी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी परिस्थिती आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमान अकोला येथे नोंदवण्यात आले. या भयानक उष्णतेमुळे अकोला जिल्ह्यात सात माकडांचा मृत्यू झाला. हवामान खात्याने महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली या भागात केंद्रीय अतिउष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, ही लाट २१ मेपर्यंत राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तेलंगणात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या ३0९ वर गेली आहे. त्यामुळे वैशाख वणव्याने महाराष्ट्र होरपळला असताना, अन्य राज्यांची स्थितीही फारशी वेगळी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला अपवाद आहे दक्षिण आणि ईशान्य भारतातील राज्यांचा. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुडुच्चेरी, आसाम, बंगाल या राज्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा कहर सुरू आहे.>प्रमुख शहरांमधील कमाल तापमान अकोला ४७.१, जळगाव ४६, परभणी व मालेगाव ४५.२, वर्धा ४५, अमरावती ४४.६, यवतमाळ ४४.४ (अंश सेल्सिअस) >विदर्भात चौघांचा बळी विदर्भात सूर्य आग ओकत असल्यासारखी परिस्थिती आहे. एकूणच जनजीवन बेहाल झाले आहे. अकोला जिल्ह्यात उष्माघाताने बुधवारी दोघांचा मृत्यू झाला. गणेश गुलाबराव खंडागळे (वय ५० रा. भांबेरी, ता. तेल्हारा), चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर येथील श्यामराव गोगुलवार (५५), वर्धा जिल्ह्यातील महेंद्र लोहकरे (५०) अशी मृतांची नावे आहेत. पातूर तालुक्यातील चिखलगाव येथे एका ६५ वर्षाचा व्यक्तीचा मृतदेह आढळला असून त्याचा मृत्यूही उष्माघाताने झाल्याचा कयास आहे. याशिवाय राज्यात उष्णतेने सात माकडांचाही बळी गेला.खान्देशात चौघांचा मृत्यूखान्देशातही बुधवारी जळगाव येथे ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात तापमान ४५.६ अंशांवर पोहोचले तर नंदुरबार येथे गेल्या तीन दिवसांपासून पारा ४४ अंशांवर कायम आहे. धुळे जिल्ह्यातील निमगूळ येथील बारीकराव रंगराव बागल (५१) आणि वारुड येथील प्रवीण देवराम चित्ते (३४) आणि जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा खुर्द येथील गोकूळ शेनफडू पाटील (६७) व रावेरच्या संभाजीनगर भागातील भागवत लालू जगताप (वय ४६) या चौघांचा बुधवारी उष्माघाताने मृत्यू झाला. आला रे... मॉन्सून आला..!तीव्र उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरात बुधवारी दाखल झाला. त्यामुळे आता लवकरच तो केरळमार्गे देशाच्या इतर भागांमध्येही दाखल होण्याची आशा वाढली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मॉन्सूनची आगेकूच होऊन तो अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.