शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांच्या भेटीला ‘आपले बाप्पा २०१६’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 01:58 IST

बाप्पाचे आगमन अगदी काही तासांवर आले आहे. मुंबई आणि उपनगरात बाप्पाची लगबग पाहायला मिळत आहे.

मुंबई: बाप्पाचे आगमन अगदी काही तासांवर आले आहे. मुंबई आणि उपनगरात बाप्पाची लगबग पाहायला मिळत आहे. या महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकमत, संस्कृती दर्पण प्रतिष्ठान आणि शुभविधी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने६ ते १३ सप्टेंबर या कालावधीत ‘आपले बाप्पा २०१६’ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, भरपूर बक्षिसांची उधळण या वेळी करण्यात येणार आहे. ‘आपले बाप्पा २०१६’ या कार्यक्रमासाठी संस्कृती दर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय दास्ताने आणि सचिव श्वेता सरवणकर यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धांप्रमाणेच या उपक्रमांतर्गत अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. गणेश सजावट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी बाप्पाच्या सजावटीचे फोटो, नाव, पत्त्यासह ूङ्मल्ल३ंू३@२ँ४ुँ५्रँ्रि.ूङ्मे या मेल आयडीवर पाठवून द्यावेत. अथवा अधिक माहितीसाठी ८६५२२००२२१, मनीषा सोलंकी - ९८१९२६०८८९ आणि प्रीती नायडू -९१६७४०४२६१ या क्रमांकांवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)>घरगुती बाप्पा आणि मंडळांसाठी अनोखी स्पर्धा यंदा या उपक्रमाच्या माध्यमातून इको फ्रेंडली घरगुती गणपती मूर्ती आणि सजावट स्पर्धा, सार्वजनिक गणेश मंडळांकरिता इकोफ्रेंडली गणेशमूर्ती, सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. >स्पर्धांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे६ सप्टेंबर मुलांसाठी खेळ स्पर्धास्थळ- गुरूदत्त मित्र मंडळ, कोहिनूर मिल, चाळ क्रमांक ५चे मैदान, महात्मा जोतिबा फुले रोड, नायगाव, दादर (पू.), वेळ- सायं. ४ ते ७ वाजेपर्यंत.७ सप्टेंबरपाककला स्पर्धा (तिखट व गोड मोदक)स्थळ- अंकुर मित्र मंडळ, दादासाहेब फाळके रोड, दादर (पू.), वेळ- सायं. ४ ते ७ वाजेपर्यंत.११ सप्टेंबर स्वच्छता अभियान, स्थळ- गणेश महाद्वार, शिवाजी पार्क, दादर (प.) वेळ- सकाळी ११ ते सायं. ४ वाजेपर्यंत.१२ सप्टेंबरनृत्य स्पर्धा (खुला गट)स्थळ- राजाराम वाडी, गणेश उत्सव मंडळ, नायगाव हायस्कूलजवळ.वेळ- सायं. ४ ते ७ वाजेपर्यंत.१३ सप्टेंबरस्त्रियांसाठी खेळ आणि विविध स्पर्धास्थळ- नीळकंठ अपार्टमेंट, गोकूलदास पास्ता रोड, दादर.वेळ- सायं. ४ ते ७ वाजेपर्यंत.१८ सप्टेंबरबक्षीस वितरण समारंभ, मंगळागौर विशेष कार्यक्रम आाणि पारंपरिक वेषभूषा स्पर्धा.>‘शुभविधी’ची पर्वणी : सर्व धार्मिक शुभविधींसाठी असलेले हे अत्याधुनिक संकेतस्थळ आहे. या माध्यमातून आॅनलाइन वधू-वर सूचक मंडळ, शास्त्रोक्त पद्धतीने अनुष्ठाने, आवर्तन पूजा, शांती पाठ, होमहवन या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच, निमंत्रण पत्रिका डिझाइन आणि प्रिंटिंगही करण्यात येते. साखरपुडा, हळद व इतर समारंभांसाठी हॉल, मैदाने उपलब्ध करून दिली जातात.