शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओएसडींना ‘संदिग्धतेचा’ लाभ!

By admin | Updated: September 27, 2016 02:32 IST

मंजूर पद नसताना विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) या पदावर मंत्र्यांकडे नियुक्ती देण्यात आली असेल तर, अशा ओएसडींची नियुक्ती तत्काळ रद्द करण्याचा आदेश सामान्य

मुंबई : मंजूर पद नसताना विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) या पदावर मंत्र्यांकडे नियुक्ती देण्यात आली असेल तर, अशा ओएसडींची नियुक्ती तत्काळ रद्द करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने आज दिला. तथापि, या आदेशातील संदिग्धतेचा फायदा मिळून मंत्र्यांच्या ओएसडींना अभयच मिळेल, असे दिसते. प्रत्येक मंत्र्यांकडे असलेले ओएसडीचे पद नियमबाह्य असल्याचे वृत्त लोकमतने दोन महिन्यांपूर्वी दिले होते. या पदाचा आकृतीबंधामध्ये समावेश नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. तसेच पीए, पीएस आणि ओएसडींच्या जबाबदाऱ्या नियमानुसार निश्चित करण्यातच आलेल्या नाहीत, याकडेही लक्ष वेधले होते. मंत्री आस्थापनेत निर्माण करण्यात आलेले ओएसडीचे पद नियमबाह्य असल्याची भूमिका सामान्य प्रशासन विभागाने आज काढलेल्या परिपत्रकात घेतली आहे. मात्र, हे करताना आकृतीबंधात मंजूर नसताना कोणाला ओएसडी नेमले असेल तर ती नियुक्ती तत्काळ रद्द करावी, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. मंत्र्यांच्या आस्थापनेत तीन पीए आकृतीबंधानुसार घेता येतात. त्यातील एक किंवा दोन पीएंचे पद हे ओएसडीमध्ये परावर्तित केले जाते. त्यामुळे मूळ आकृतीबंधाला धक्का न लावता ओएसडींना नेमण्याची चलाखी केली जाते. या पार्श्वभूमीवर, ‘कोणत्याही मार्गाने ओएसडी नेमणे नियमबाह्य आहे’, अशी स्पष्ट भूमिका सामान्यप्रशासन विभागाने घ्यायला हवी होती, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केले. विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी काढलेल्या परिपत्रकात, ओएसडींचे कर्तव्य आणिजबाबदारी निश्चित नसल्याने त्यांच्या कामकाजाचे मूल्यमापण करणे शक्य नाही. तसेच या पदावरील व्यक्तीकडून काही अनियमितता झाल्यास ते पदच नसल्याने कारवाई करणे शक्य होणार नाही, असे नमूद केले. मात्र, यापुढे कोणत्याही परिस्थितीत ओएसडी हे पद राहणारच नाही, अशी रोखठोक भूमिका घेतली असती तर सगळे ओएसडी घरी गेले असते पण, तसे न म्हटल्याने एकप्रकारे ओएसडींना अभयच मिळाले आहे. (विशेष प्रतिनिधी) शासनाचे आर्थिक नुकसाननियमानुसार मंत्र्यांकडील खासगी सचिव हे वर्ग एक श्रेणीचे (अवर सचिव/उपजिल्हाधिकारी) अधिकारी असावेत. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील अनेक मंत्र्यांकडील खासगी सचिव हे त्यावरील पदांचे अधिकारी आहेत. वरच्या पदांवरील अधिकाऱ्यांना खालच्या पदावर नेमल्याने वरची पदे रिक्त तर राहतातच शिवाय शासनाचे आर्थिक नुकसानदेखील होते.