शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्कर गुंतवणूकदारांचा मोर्चा

By admin | Updated: August 23, 2016 02:59 IST

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई जलदगतीने व्हावी यासाठी सोेमवारी (२२ आॅगस्ट) प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा कढण्यात आला

महाड/बिरवाडी : आॅस्कर मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीने महाड, पोलादपूर, गोरेगाव, अलिबाग, पुणे येथे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई जलदगतीने व्हावी यासाठी सोेमवारी (२२ आॅगस्ट) प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा कढण्यात आला होता.आॅस्कर मॅनेजमेंट कंपनीव्दारे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. ठरावीक कालावधीत परतावा न मिळाल्याने रायगड जिल्ह्यातील महाड, बिरवाडी, गोरेगाव, अलिबागसह पुणे येथील आॅस्कर कंपनीने गोरगरीब १२ हजार गुंतवणूकदारांची १५ कोटी रु पयांना फसवून पलायन केले असून शाखा व्यवस्थापकांना अटक करण्यासाठी गुंतवणुकदार रस्त्यावर उतरले आहेत. आॅस्कर पीडित ग्राहकांनी प्रांतकार्यालयावर मोर्चा काढून गोरगरीब जनतेचे पैसे परत करून गोरगरिबांना न्याय देण्याची मागणी केली. याचबरोबर आॅस्कर मॅनेजमेंट या कंपनीकडून आपली फसवणूक झाली आहे व आपले कष्टाचे ६ लाख रूपये बुडीत गेले आहेत, अशी माहिती आॅस्कर मॅनेजमेंटचे गुंतवणूकदार लक्ष्मण सखाराम कदम यांना कळताच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २५ जुलै रोजी घडली आहे. या मृत्यूप्रकरणी बिरवाडी येथील शाखा व्यवस्थापक दिनेश पवार व संपत झांजे यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांचा मुलगा संजय कदम यांनी केली आहे.महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे हे पूर्व नियोजित कामाकरिता महाडबाहेर गेले असल्याने मोर्चेकऱ्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांचे शिरस्तेदार नायब तहसीलदार सुभाष जगदाळे यांनी स्वीकारत तुमचे निवेदन शासनापर्यंत पोहचवून योग्य तो पाठपुरावा करून दोषींविरोधात कारवाई होईल असे आश्वासन दिले. हे निवेदन देताना प्रभाती स्वाई, दीपक स्वाई, संजय कदम, शिंदे आदिंसह आॅस्कर पीडित ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)