शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अवयव प्रत्यारोपणास देणार गती

By admin | Updated: June 30, 2016 01:29 IST

पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

सायली जोशी - पटवर्धन,

पुणे- पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ग्रीन कॉरिडॉर ही संकल्पना येत्या काळात आणखी विकसित करण्याचा विचार आहे. यासाठी सर्व शहरांचा एकमेकांशी समन्वय राहील, यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पुणे आणि राज्यात चालू असणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याबाबत ते म्हणाले, ‘‘पीसीपीएनडीटीच्या वादावर राज्य शासनाचे बारकाईने लक्ष आहे. डॉक्टर आणि संबंधित यंत्रणा यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न शासन करणार आहे. या दोन्हींच्या बाजू समजून घेऊन लवकरच योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. याबरोबरच कायद्याचा विपर्यास किंवा अतिरेक काढून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाशी बोलणे चालू आहे.’’नव्याने करण्यात आलेली महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेत अनेक बदल करण्यात आले असून जास्तीत जास्त रुग्णाांना या योजनांचा फायदा कसा होईल यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले. तळागाळातील नागरीकांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्यात यासाठी जनजागृती महत्त्वाची असून त्यासाठी विशेष यंत्रणा करण्याचा विचार आहे. पुण्यातील शासकीय कॅन्सर रुग्णालयाबाबत प्रस्ताव राज्य शासनाकडे आला आहे असे सांगत असतानाच या रुग्णालयासाठी जागेचा शोध चालू असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. >सध्या पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांमध्ये खासगी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण होते. त्याचबरोबर शासकीय रुग्णालयातही अवयव प्रत्यारोपण व्हायला हवे. एखाद्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णाचे अवयव प्रत्यारोपण झाल्यास ते शासनाचे खरे यश असेल. त्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.विसंवाद हेच कारणडॉक्टरांवरील हल्ल्याला विसंवाद हे प्रमुख कारण असून यासाठी डॉक्टरांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. यामध्ये रुग्णाची मानसिकता जाणून त्यानुसार काही गोष्टींची आखणी करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आज तसे काहीच होत नाही. कारण प्रत्येक जण व्यावसायिक झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांबद्दल रुग्णांच्या मनात असणारा आदर दिवसेंदिवस कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. फॅमिली फिजिशियन ही संकल्पना लोप पावत असल्याचेही दीपक सावंत म्हणाले.