शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मशिदींवरील बेकायदा भोंगे काढण्याचे आदेश

By admin | Updated: August 29, 2015 01:58 IST

मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवर लावलेले भोंगे परवानगी घेऊन लावले आहेत की नाही याची शहानिशा करा व विना परवानगी मशिदींवर भोंगा लावला असल्यास तो काढून टाका, असे आदेश उच्च

मुंबई : मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवर लावलेले भोंगे परवानगी घेऊन लावले आहेत की नाही याची शहानिशा करा व विना परवानगी मशिदींवर भोंगा लावला असल्यास तो काढून टाका, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा राज्य शासनाला दिले.गेल्या वर्षी ३० जुलैला न्यायालयाने हे आदेश शासनाला दिले होते. यासाठी नवी मुंबईतील संतोष पाचगळ यांनी अ‍ॅड. दीनदयाळ धनुरे यांच्यामार्फत फौजदारी जनहित याचिका केली आहे. नवी मुंबईतील अंदाजे ४९ मशिदींवर विना परवानगी भोंगे लावण्यात आले आहेत. तसेच रुग्णालय, शाळा व महाविद्यायल ही ठिकाणे शांतता क्षेत्र घोषित केली जातात. तरीही अशा ठिकाणीदेखील मशिदींवर भोंगे लावले आहेत. हे भोंगे काढून टाकावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.त्यावर न्या. व्ही.एम. कानडे व निवृत्त न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर गेल्या वर्षी सुनावणी झाली होती. त्या वेळी न्यायालयाने सण-उत्सवात परवानगी घेऊन लाऊडस्पिकर लावले जातात का, असा सवाल केला होता. त्याची दखल घेत याचिकाकर्त्याने माहितीच्या अधिकाराखाली याची माहिती मिळवली. त्यात सण-उत्सवात परवानगी घेऊनच लाऊडस्पिकर लावले जातात, अशी माहिती मिळाल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयासमोर स्पष्ट केले.त्याची नोंद करून घेत न्यायालयाने मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवर परवानगी घेऊन भोंगे लावले गेले आहेत की नाही याची शहानिशा करण्याचे आदेश शासनाला दिले.न्या. व्ही.एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर पुन्हा शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे अ‍ॅड. धनुरे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. तसेच राज्यभरात कोठे मशिदीवर विना परवानगी भोंगा लावला असल्यास त्यावर कारवाई करावी, अशी नव्याने मागणी याचिकेत करण्यात आल्याचे अ‍ॅड. धनुरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.