शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जळालेल्या मोटारीच्या बदल्यात नवी मोटार देण्याचे आदेश

By admin | Updated: January 16, 2015 05:32 IST

खरेदी केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत प्रवासात अचानक इंजिनाला आग लागून जळून भस्मसात झालेल्या अ‍ॅम्बेसेडर मोटारीच्या बदल्यात हिंदुस्तान मोटर्स या उत्पादक कंपनीने

मुंबई : खरेदी केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत प्रवासात अचानक इंजिनाला आग लागून जळून भस्मसात झालेल्या अ‍ॅम्बेसेडर मोटारीच्या बदल्यात हिंदुस्तान मोटर्स या उत्पादक कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागास नवी कोरी मोटार द्यावी किंवा नव्या मोटारीसाठी सव्याज पैसे द्यावेत, असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.धुळे जिल्हा ग्राहक मंच आणि महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाने यापूर्वी असाच आदेश दिला होता. त्याविरुद्ध हिंदुस्तान मोटर्सने केलेले अपील फेटाळताना राष्ट्रीय आयोगाचे पीठासीन सदस्य जे. एम. मलिक आणि सदस्य एस. एम. कान्टीकर यांनी, मोटारीचे उत्पादनच मुळात सदोष होते, आस स्पष्ट निष्कर्ष नोंदवून हा निकाल दिला. हिंदुस्तान मोटर्स कंपनीने पाटबंधारे विभागास तशीच नवी कोरी मोटार द्यावी किंवा आता त्यांनी तशा मोटारींचे उत्पादन बंद केले असेल तर नव्या मोटारीसाठी घटनेच्या दिवसापासून ९ टक्के व्याजासह पैसे द्यावेत, असे न्यायालयाने सांगितले. या आदेशाची अंमलबजावणी ४५ दिवसांत करायची आहे.धुळे पाटबंधारे विभागाने १२ जून १९९८ रोजी औरंगाबाद येथील मे. कैलाश एजन्सीजकडून हिंदुस्तान मोटर्सच्या चार अ‍ॅम्बॅसॅडर मोटारी खरेदी केल्या होत्या. यानंतर चारच महिन्यांनी यातील एक मोटार घेऊन विभागाचे अधिकारी शिरपूर तालुक्यातील अभानपूर येथील एका पाझर तलावाच्या कामाची तपासणी करण्यासाठी निघाले होते. जेमतेम १४ किमी अंतर गेल्यावर मोटारीच्या इंजिनाने अचानक पेट घेतला व बघता बघता संपूर्ण मोटारीची जळून राख झाली. सुदैवाने या दुर्घटनेतून विभागाचे अधिकारी सुखरूप बचावले होते. तत्कालिन कार्यकारी अभियंता अशोक नारायण पवार यांनी पाटबंधारे विभागाच्या वतीने ग्राहक न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.या सुनावणीत कंपनीसाठी अ‍ॅड. कपिल खेर यांनी तर पाटबंधारे विभागासाठी अ‍ॅड.प्रेषित सुरशे यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)