शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षातील मोठे नेते ‘टार्गेट’

By admin | Updated: February 10, 2016 01:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. विरोधी पक्षांचे खच्चीकरण करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा यामागे

- प्रमोद गवळी, नवी दिल्लीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. विरोधी पक्षांचे खच्चीकरण करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा यामागे डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.मिळकतीहून अधिक संपत्ती जमविल्याच्या प्रकरणात ‘ईडी’च्या कारवाईचा सामना करणाऱ्या भुजबळ कुटुंबाचे प्रमुख व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मंगळवारी अमेरिकेहून मुंबईत परतले. यावेळी मुंडे व माजी मंत्री सुनील तटकरे दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. यासंदर्भात विचारणा केली असता ही बैठक अगोदरच ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्णातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसमवेत जावडेकर यांच्यासोबत बैठकीची वेळ २९ जानेवारी रोजीच निश्चित झाली होती. त्यानुसार आम्ही दिल्लीत आलो. या कालावधीत वेगवान राजकीय घडामोडी झाल्या.राष्ट्रवादीकडून कुठलेही निर्देश नाहीतभुजबळ यांच्या प्रकरणात काहीही वक्तव्य न करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही निर्देश देण्यात आले आहेत का अशी तटकरे यांना विचारणा करण्यात आली. अशा पद्धतीचे कुठलेही निर्देश मिळालेले नाहीत. या प्रकरणात खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आम्ही बोलणे योग्य ठरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.मंत्र्यांविरोधात चौकशी का नाही ?विधिमंडळात आम्ही राज्यातील काही मंत्र्यांच्या विरोधात घोटाळ््याचे पुरावे दिले आहेत. परंतु तरीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याविरोधात कुठलीही चौकशी करायला तयार नाहीत. भ्रष्टाचाराविरोधातील त्यांचा लढा केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांपुरताच मर्यादित आहे, हे यातून स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन मुंडे यांनी केले.चौकशीचे स्वागतचसिंचन घोटाळ््यामध्ये सुनील तटकरे यांचीदेखील चौकशी करण्यात येईल, असे वक्तव्य महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांअगोदर दिले होते. यासंदर्भात विचारणा केली असता कुठल्याही चौकशीचे आपण स्वागत करतो. चौकशी पूर्ण झाल्यावर मी निर्दोष सिद्ध होईल, असा दावा तटकरे यांनी केला.