शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रसरकाच्या दुष्काळनिधीवर विरोधकांचे टिकास्त्र

By admin | Updated: December 29, 2015 21:34 IST

केंद्रसरकारने आज जाहीर केलेल्या ३१०० कोटी रूपयांच्या दुष्काळ निधीवर विरोधीपक्षातून टिका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे, मिळालेला निधी कमी आणि तटपुंजा असल्याचा सुर विरोधकांनी आवळला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ - केंद्रसरकारने आज जाहीर केलेल्या ३१०० कोटी रूपयांच्या दुष्काळ निधीवर विरोधीपक्षातून टिका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे, मिळालेला निधी कमी आणि तटपुंजा असल्याचा सुर विरोधकांनी आवळला आहे.राज्याच्या इतिहासात यंदाचे वर्ष सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचे ठरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कर्जमाफी व भरीव आर्थिक मदतीच्या पॅकेजची अपेक्षा होती. शिवसेनेने ५० हजार कोटी रूपयांचे पॅकेज मागितले होते. ती मागणी लक्षात घेता भाजप-शिवसेना सरकार किमान १०-१५ हजार कोटी रूपये तरी केंद्राकडून आणेल, असे वाटत होते. परंतु, ही अपेक्षा फोल ठरली अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली आहे.तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला मदत देण्यात केंद्र सरकारने विलंब केला. अनेक राज्याना आधीच मदत देण्यात आली. चारवेळा केंद्रीय पथक येऊन गेले. किमान ४५०० कोटी रुपये द्यायला हवे होते. आता मिळालेली मदत सावकारांच्या घश्यात न टाकता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने टाकली पाहिजे असे मत व्यक्त केले. ज्याप्रमाणे राज्य सरकारनं हेमा मालिनी यांना भुखंड देण्याकरिता तत्परता दाखवली त्याच तत्परतेनं आता गिरणी कामगारांच्या घराचा आणि दामुनगरचा प्रश्न सोडवा अशी मागणी सचिन अहीर यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले ३१०० कोटी रूपयांचे पॅकेज अपुरे असून, यातून शेतक-यांना नेमकी किती नुकसानभरपाई मिळणार? अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला केली आहे.दुष्काळ निवारणासाठी मदत निश्चित करणाऱ्या उच्चाधिकार समितीची बैठक, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंग, नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहर्षी तसेच गृह, अर्थ व कृषी मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.