शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजच्या मुद्यावर विरोधक आक्र मक

By admin | Updated: December 10, 2014 00:46 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी. यासाठी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळ परिसरात

आधी पॅकेज नंतर कामकाज : विधिमंडळ परिसरात जोरदार नारेबाजीनागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी. यासाठी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळ परिसरात मोर्चा काढला. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे सदस्य मोर्चाने आले. शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी, आत्महत्यांचा मेळ नाही मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. अशा घोषणा देत होते. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे, विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या सदस्यांचा समावेश होता.राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्या थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. आधी पॅकेजची घोषणा नंतरच चर्चा, त्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. राज्यातील १९ हजाराहून अधिक गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी पॅकेज मंजूर करून घोषणा करायला हवी. यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार नारेबाजी करीत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली. विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते राधाकृ ष्ण विखे-पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे,वीरेंद्र जगताप, राजेंद्र जैन, विद्या चव्हाण, धनंजय मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. (प्रतिनिधी)स्वस्थ बसणार नाहीशेतकरी संकटात असल्याने सरकारने आधी पॅकेजची घोषणा करावी व नंतर चर्चा घ्यावी, त्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका राधाकृ ष्ण विखे-पाटील यांनी मांडली.दोन हजार कोटी फारच कमीराज्यात भीषण दुष्काळ आहे. संकटग्रस्त शेकऱ्यांना मदत करण्यासाठी दोन हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आहे. तितकीच मदत शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा विचार आहे. परंतु ही रक्कम तुटपुंजी असल्याचे सुनील तटकरे म्ह्णाले.विरोधकांत एकजूटअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पॅके जच्या मुद्यावर एकजूट झाल्याचे चित्र बघायला मिळाले. जनतेच्या प्रश्नावर एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.