शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

कांदा गोणी मार्केट विरोधात सर्वपक्षीय एल्गार

By admin | Updated: July 30, 2016 20:11 IST

कांदा गोणी मार्केट विरोधात शेतक-यांनी एल्गार पुकारला असून बुधवार पासून कांदा गोणी लिलाव होऊ देणार नाही हि भूमिका जाहीर केली

ऑनलाइन लोकमत - 
लासलगाव (नाशिक), दि. 30 - शासनाच्या नियमन मुक्ती विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आडमुठे धोरणाच्या विरोधात शनिवारी सायंकाळी  लासलगाव खरेदी विक्री संघात सर्वपक्षीय बैठकीत कांदा गोणी मार्केट विरोधात शेतक-यांनी एल्गार पुकारला असून बुधवार पासून कांदा गोणी लिलाव होऊ देणार नाही हि भूमिका जाहीर केली. सोमवार एक ऑगस्ट  रोजी निफाड तहसीलदार व प्रांत  अधिकारी यांना यासंदर्भात परिसरातील शेतकरी निवेदन देणार असून बुधवारपासून लासलगाव, निफाड मार्केट यार्डात गोणी लिलाव होऊ देणार नाही अशी भूमिका सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या बैठकीत  जाहीर केली. 
शेतकऱ्यांना वेठीस धरून शासनाच्या नियमन मुक्तीच्या विरोधात शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या तोंडून नको ते वदवून घेतले जात आहे. या पद्धतीने शासनावर दबाव टाकण्याचा व्यापाऱ्यांच्या कुटील डाव असून तो उधळून लावण्यासाठी सर्वानी  कंबर कसावे  असे  आवाहन भाजपाचे जेष्ठ नेते सुरेश बाबा पाटील यांनी या वेळी केले..
नियमन मुक्ती मुळे बाजार व्यवस्थेत व्यापाऱ्यांची असलेले मक्तेदारी मोडीत निघणार आहे, शेतकऱ्यांची आड्तीच्या जोखंडातून  झालेली मुक्तता का क्रांतिकारी निर्णय कुठल्याही परिस्थितीत बदलला जाऊ नये यासाठी आपण सर्वानी जागरूक राहणे गरजेचे आहे वेळ पडल्यास या कमी वेगळी बाजार व्यवस्था उभी करण्याचे सुतोवाच हि यावेळी नानासाहेब पाटील यांनी पाटील याने केले. यासाठी सर्व शेतकरी बांधवानी सोमवारी दुपारी दोन वाजता निफाड तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन भाजपा नेते सुरेश बाबा पाटील व नाफेचे संचालक नानासाहेब पाटील यांनी या वेळी केले.
या बैठकीला भाजपाचे जेष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील,निप्फड नगरीचे प्रथम नागरिक राजाभाऊ शेलार,शेतकरी संघटनेचे बाबासाहेब गुजर,शिवसेना नेते राजाभाऊ दरेकर ,शिवा सुरासे,लासलगाव ग्रा. प. सदस्य डी.के.नाना जगताप,बाजार समितीचे संचालक  बबनराव सानप,वैकुंठ पाटील,मोतीराम मोगल,लोकनेते दत्ताजी पाटील बँकेचे संचालक तुळशीराम जाधव,लक्षमण मापारी,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष नितीन घोटेकर,एल.के.बडवर ,राजेंद्र दरेकर,राजाराम मेमाणे,भाजपाचे सुरेश दाते,विलास थोरे,यांच्या सह निफाड तालुक्यातील विविध पक्षाचे पाधादिकारी या बैठकीस हजर होते