शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कौतुक करायची संधीच हिरावून नेली

By admin | Updated: June 4, 2014 00:24 IST

गोपीनाथ मुंडे यांचे कौतुक करण्याची तयारी आयएलएस विधी महाविद्यालयातर्फे सुरू करण्यात आली होती. परंतु, काळाने आमच्याकडून ही संधीच हिरावून घेतली, अशी हळहळ आयएलएस विधी महाविद्यालयाने व्यक्त केली.

विधी महाविद्यालयाने व्यक्त केली हळहळपुणे : आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी लोकशाही प्रक्रियेतून लोकसभेसाठी विक्रमी मतांनी विजयी होतो, केंद्रीय मंत्रिपदी विराजमान होतो, केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेतृत्व करतो,अशा लोकनेत्याचे व आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांचे कौतुक करण्याची तयारी आयएलएस विधी महाविद्यालयातर्फे सुरू करण्यात आली होती. परंतु, काळाने आमच्याकडून ही संधीच हिरावून घेतली, अशी हळहळ आयएलएस विधी महाविद्यालयाने व्यक्त केली.मुंडे यांनी पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयातील वसतिगृहातच राहून त्यांनी शिक्षणासह राजकीय क्षेत्रातही काम केले. माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख हे सुध्दा आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या व विविध क्षेत्रात कामगिरी करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातर्फे नेहमीच कौतुक केले केले जाते. परंतु, मुंडेंचे भरभरून कौतुक करण्याची संधी महाविद्यालयाला दुर्दैवाने मिळू शकली नाही, याबद्दल प्राचार्या डॉ. वैजयंती जोशी यांनी खेद व्यक्त केला.महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून मुंडे यांचा नेहमीच अभिमान वाटतो,असे सांगत जोशी म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. बीडमधून विक्रमी मतांनी विजयी झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपद मिळविले. त्यामुळे त्यांचे महाविद्यालयात बोलावून कौतुक करावे, या दृष्टीने प्राथमिक तयारी सुरू केली होती. मुंडे यांना महाविद्यालयातर्फे अभिनंदनाचे पत्रही पाठविले जाणार होते. महाविद्यालयात उपलब्ध असलेली व त्यांच्याशी निगडीत असलेली कागदपत्रेही त्यांना आठवण म्हणून दिली जाणार होती. परंतु,ही धक्कादायक बातमी समजल्यामुळे काय बोलावे, हे सुचत नाही.मुंडे यांनी १९७२-७३ मध्ये आयएलएस विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांच्या हस्ताक्षरातील १०२ अनुक्रमांक असलेला प्रवेश अर्ज महाविद्यालयात उपलब्ध आहे,असे सांगत जोशी म्हणाल्या,१९७२-७३ मध्ये तीन वर्षाची एलएलबी व दोन वर्षाची बॅचलर ऑफ जनरल लॉज (बीजीएल)या दोन पदव्या अस्तित्वात होत्या. नोव्हेंबर ७२ ते ऑक्टोबर ७३ या शैक्षणिक वर्षात मुंडे यांनी बीजीएल अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. परंतु,ते एप्रिल १९७४ मध्ये प्रथम वर्षास उत्तीर्ण झाले. मुंडे हे महाविद्यालयातील वसतीगृहातही वास्तव्यास होते.यासंदर्भातील नोंदही उपलब्ध आहे. मुंडे यांनी प्रवेश अर्जात पालक म्हणून पंडित मुंडे यांचे नाव टाकले होते. शेती हा व्यवसाय तसेच एक हजार रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचे त्यांनी प्रवेश अर्जात नोंदविले होते.