शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या दुधाला वितरकांचा विरोध

By admin | Updated: October 20, 2016 06:51 IST

सहकारी दूध संस्था डबघाईला आलेल्या असताना, गुजरातच्या ‘अमूल’नंतर आता कर्नाटक सहकारी दूध उत्पादन फेडरेशन (केएमएफ)च्या ‘नंदिनी’ ब्रॅण्डचे दूध राज्यात आले

मुंबई : राज्यातील सहकारी दूध संस्था डबघाईला आलेल्या असताना, गुजरातच्या ‘अमूल’नंतर आता कर्नाटक सहकारी दूध उत्पादन फेडरेशन (केएमएफ)च्या ‘नंदिनी’ ब्रॅण्डचे दूध राज्यात आले असून त्याचा शुभारंभ बुधवारी एका पंचतारांकित हॉटेलात करण्यात आला. मात्र, ‘केएमएफ’कडून आपली फसवणूक झाल्याचे सांगत एका वृद्धाने व्यासपीठावर घसून गोंधळ घातला. तर ‘महानंद’च्या वितरकांनी ‘नंदिनी’ला विरोध केल्याने दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत.राजकीय नेत्यांच्या खासगी दूध संघांमुळे आधीच राज्यातील सहकारी दूध संघ डबघाईला आलेले असताना सरकार परप्रांतातील दुधासाठी पायघड्या घालत आहे. खासगी दुग्ध उत्पादकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी गोकूळ, वारणा, कात्रज या संस्थांच्या मदतीने महाराष्ट्राचा एकच ब्रँड आणण्याचा मनोदय मंत्री जानकर यांनी बोलून दाखवला होता. मात्र, तो अमलात येण्याआधीच कर्नाटकच्या दुधाचे आगमन झाले.कर्नाटक सहकारी दूध उत्पादन फेडरेशन (केएमएफ)च्या ‘नंदिनी’ या दूध ब्रॅण्डचा शुभारंभ बुधवारी कर्नाटकचे पशुसंवर्धन आणि रेशीम उत्पादन मंत्री ए. मंजू, कर्नाटकातील श्री मंजुनाथेश्वर मंदिराचे धर्माधिकारी पद्मविभूषण डॉ. डी वीरेंद्र हेगडे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. या वेळी खा. गोपाळ शेट्टीही व्यासपीठावर होते. मात्र, केएमएफने २० वर्षांपूर्वीही मुंबईत दूध उत्पादन आणले होते. त्यावेळी तब्बल १८ लाखांची फसवणूक करून त्यांनी परस्पर मुंबईतील वितरण बंद केले, असा आरोप एका व्यक्तीने केल्याने सभागृहात खळबळ उडाली. ‘महानंद’च्या वितरकांचा विरोधजिल्हा दूध संघांकडून संकलित केलेले दूध महानंदासारख्या शासकीस ब्रॅण्डला पुरविण्याऐवजी ‘मदरडेअरी’कडे वळविण्यात येते. त्यामुळे महानंदाला बाहेरून दूध घेऊन वितरण करावे लागते. आजच मुंबईत आलेल्या कर्नाटकच्या केएमएफकडून महानंदाने २ लाख लिटर सुटे दूध घेतले आणि पॅकिंग करून वितरण केले. परराज्यातील अमूल, केएमएफ अशा दूध ब्रॅण्डना राज्य शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. बाहेरचे दूध इथे आणून विकले जाते. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि वितरकांचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोप महानंदा वितरक संघाचे उपाध्यक्ष धर्मेंद्र काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. (प्रतिनिधी)>मंत्र्यांना घालणार होते घेराव...कर्नाटकातील सहकारी दूध उत्पादनाच्या मुंबईतील शुभारंभासाठी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वितरक संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित राहिले. मंत्र्यांना घेराव घालून याचा जाब विचारणार असल्याचे काळे यांनी सांगितले. मात्र वाद टाळण्यासाठी जानकर यांनी कार्यक्रमाला बगल दिली.