शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

स्वतंत्र्य विदर्भावरून विरोधकांचा हल्लाबोल

By admin | Updated: July 29, 2016 01:24 IST

भारतीय जनता पार्टी स्वतंत्र विदर्भाचा छुपा अजेंडा राबवत असून याचाच एक भाग म्हणून राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्र्यांना ई मेल पाठविले जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चालविल्या

मुंबई : भारतीय जनता पार्टी स्वतंत्र विदर्भाचा छुपा अजेंडा राबवत असून याचाच एक भाग म्हणून राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्र्यांना ई मेल पाठविले जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चालविल्या जाणा-या या मोहिमेमुळे सर्वोच्च न्यायालयातील बेळगाव लढ्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप गुरूवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान परिषदेत केला. सभापतींनी याबाबतची स्थगन प्रस्तावाची सूचना नाकारल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. अखंड महाराष्ट्राबाबत काँग्रेस सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. सभागृहातील सर्व कामकाज बाजूला सारून यावर चर्चा करणे का गरजेचे आहे हे सांगताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नारायण राणे, शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी भाषणे केली. १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडून उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे कराल तर याद राखा, असा दमही विरोधकांनी सत्ताधारी पक्षास भरला. तुम्ही महाराष्ट्राचे आहात, एकट्या विदर्भाचे मंत्री नाहीत, विदर्भाचा जरूर विकास करा, पण महाराष्ट्र तोडायची भाषा करू नका. पद आणि अस्मिता यांची तुलना अखंड राज्याशी कदापि होवू शकत नाही. राज्य तोडायची गोष्ट मनातून काढा आणि जनतेने बहाल केलेली सत्ता व पदाला प्रामाणिक राहा, असे राणे यांनी सुनावले. विरोधी पक्षनेते मुंडे यांनी काँग्रेसच्या अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाच्या सूचनेला पाठिंबा दिला. तुम्हाला वेगळा विदर्भ करायचा आहे, तर मग त्यावर सभागृहात स्वतंत्र चर्चा ठेवा, अशी मागणी मुंडे यांनी केली. बेळगाव, निपाणी हा सीमाभाग महाराष्ट्रात येण्यासाठी तडपतो आहे. याबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. फडणवीस सरकार महाराष्ट्राची बाजू न्यायालयात मांडत आहे. अशा काळात भाजपा कार्यकर्त्यांकडून लाखो ई- मेल केंद्र सरकारला वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जात असतील तर ती अत्यंत खेदाची गोष्ट आहे, असे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना नाकारत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)