शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक उतरले रस्त्यावर!

By admin | Updated: March 30, 2017 04:53 IST

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा नारा देत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारविरोधी एल्गार

राकेश बोरकुंडवार / सिंदेवाहीराज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा नारा देत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारविरोधी एल्गार पुकारत किसान कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला बुधवारपासून सुरुवात केली.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही ते पनवेल अशी तीन टप्प्यांत ही यात्रा असून, पहिला टप्पा सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाठ) या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावातून सुरू झाला. येथील बंडू करकाडे (४२) या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी संघर्ष यात्रेतील आमदारांचा ताफा या शेतकऱ्याच्या घरी पोहोचला. या शेतकरी कुटुंबावर असलेले कर्ज दूर करण्यासाठी ही संघर्ष यात्रा पुढाकार घेईल, असे या वेळी सांगण्यात आले. या वेळी बोलताना काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्यातील भाजपा सरकार उद्योगपतीधार्जिणे असून, उद्योजकांचे कर्ज सरकार माफ करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जाची आठवण आली नाही. सरकारमध्ये असताना केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाची विसरण पडली आहे. निव्वळ या सरकारच्या दुर्लक्षपणामुळे मागील दोन वर्षांत राज्यात ९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेनेच्या आमदारासह १५६ आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी रेटून धरली. त्यामुळे सभागृहात आर्थिक बजेटच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळविणे कठीण होते. म्हणूनच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आमदारांना निलंबन करून या सरकारने आपला बचाव केला, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. या वेळी आ. बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, योगेंद्र कवाडे, हर्षवर्धन पाटील, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते व जिल्ह्या-जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते.नागपुरात संघर्षच, यात्रेतून नेते गायबया यात्रेतून नागपुरातील काँग्रेस नेते दूरच असल्याचे पाहायला मिळाले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत यात्रेत सहभागी झाले नाहीत.त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला निघाले असताना, नागपुरात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अद्याप शांत झालेला नाही, असे चित्र समोर आले आहे. मार्गात अनेक ठिकाणी स्वागतया संघर्ष यात्रेचे मार्गात अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले. रणरणत्या उन्हातही शेतकरी स्वागतासाठी मार्गावरील अनेका गावांमध्ये प्रतीक्षेत होते. नागपूरवरून या वाहनांचा ताफा येताना कानपा, मूल, चंद्रपुरातील जनता कॉलेज चौक आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. मिळेल ते खा, बडेजाव टाळा...संघर्षयात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेताना डोळ्यावर गॉगल लावू नये, मिळेल ते खावे. या काळात पांढऱ्या खादीचे वस्त्र परिधान करावे, अशा नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, यात्रेची सुरुवातच एसी बसमधून झाल्याने चर्चेचा विषय ठरली.