शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसे यांचा दुटप्पीपणा उघड

By admin | Updated: May 12, 2014 04:05 IST

घरकूल प्रकरणी विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.

घरकूल प्रकरण : रमेशदादांचे आव्हान स्वीकारणार काय? जळगाव : घरकूल प्रकरणी विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. घरकूल प्रकरणात खडसे यांनी नेहमीच एकतर्फी आणि पक्षपाती भूमिका घेतल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. सुरेशदादा जैन यांचा द्वेष हेच त्यामागील कारण आहे. जैन यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणा, सत्ताधारी पक्ष यांच्यावर दबाव आणून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. भ्रष्टाचाराविरुध्द लढाईचा दावा जरी खडसे करीत असले तरी त्यात तथ्य नाही, हे त्यांच्या भूमिकेतून वारंवार दिसून आले आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात जळगावात देवकरांच्या ह˜ामुळे सहा वर्षापूर्वीचे प्रकरण उकरुन काढल्याचा गौप्यस्फोट केला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी खडसे यांनी फैजपूरच्या सभेत देवकरांना मीच तसे सूचविले होते, असे वक्तव्य करीत या कामगिरीचे पितृत्व स्वत:कडे घेतले. देवकर या प्रकरणातील एक आरोपी असून सध्या कारागृहात आहेत. भ्रष्टाचाराविरुध्द लढाईची तुतारी फुंकणार्‍या खडसे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या देवकर यांची मदत घेतली, हे त्यांच्याच वक्तव्यातून उघड झाले. व्यक्तीद्वेषापोटी तत्त्वाला तिलांजली दिल्याचा हा प्रकार जळगावकरांना नवीन नाही. देवकरांसारख्या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यावर दबाब आणणार्‍या खडसे यांनी पोलीस दलाला नेहमी दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. तपासाधिकारी इशू सिंधू ऐकत होते, म्हणून ते चांगले आणि पोलीस अधीक्षक जयकुमार ऐकत नाही, म्हणून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची खडसे यांची दुटप्पी भूमिका पुन्हा उघड झाली. जयकुमार यांनी अहवालात सूर्यवंशी यांच्या आजाराविषयी उल्लेख करुनही खडसे तसा उल्लेख नसल्याचे धडधडीत खोटे बोलत आहेत. स्वार्थासाठी मानभावीपणा लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांची प्रचार फलके, पत्रके, जाहिरातींमध्ये सुरेशदादा जैन यांचे छायाचित्र खडसे यांनी ठळकपणे घेतले. शिवसेनेचे आमदार म्हणून त्यांचे छायाचित्र घेत असताना त्याच सेनेच्या पक्षप्रमुखांनी सुरेशदादा जैन यांच्यावर राजकीयदृष्टया अन्याय होत असल्याची भूमिका जाहीरपणे घेतल्याकडे कानाडोळा केला. हा मानभावीपणा खडसे हे स्वार्थासाठी करीत आहेत, हे स्पष्ट आहे. आव्हानाकडे लक्षखान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी खडसे यांना आरोप सिध्द करण्याचे आव्हान दिले आहे. ते आव्हान आता खडसे स्वीकारतात काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)